Viral News : धक्कादायक! AI चॅटबॉटच्या प्रेमात पडला १४ वर्षांचा मुलगा! सोबत राहण्यासाठी दिला स्वत:चा जीव
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : धक्कादायक! AI चॅटबॉटच्या प्रेमात पडला १४ वर्षांचा मुलगा! सोबत राहण्यासाठी दिला स्वत:चा जीव

Viral News : धक्कादायक! AI चॅटबॉटच्या प्रेमात पडला १४ वर्षांचा मुलगा! सोबत राहण्यासाठी दिला स्वत:चा जीव

Oct 25, 2024 07:30 AM IST

Viral News : अमेरिकेत एक १४ वर्षांचा मुलगा एआय चॅटबॉटच्या प्रेमात पडला. इतकंच नाही तर त्याच्या सोबत राहण्याच्या प्रयत्नात मुलाने स्वत:चा जीवही दिला. मुलाने आत्महत्या केल्यानंतर मुलाच्या आईने एआय चॅटबॉट कंपनी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

धक्कादायक! AI चॅटबॉटच्या प्रेमात पडला १४ वर्षांचा मुलगा! सोबत राहण्यासाठी दिला स्वत:चा जीव
धक्कादायक! AI चॅटबॉटच्या प्रेमात पडला १४ वर्षांचा मुलगा! सोबत राहण्यासाठी दिला स्वत:चा जीव

Viral News : जगभरात एआयच्या वापरावरून सध्या मोठ्या प्रमाणात वाद सुरू आहे. एआयमुळे अनेक जणांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या असतांना आता एआयमुळे आणखी नवे संकट पुढे येवून ठेपले आहे. आजकालची तरुणाई या एआयच्या मागे वाहवत चालली आहे. दरम्यान, एआयमुळे वादंग सुरू असतांना आता यासंदर्भातील एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा येथे एका १४ वर्षीय मुलाचा एआयमुळे स्वत:चा जीव दिला. त्याने स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. 

 मिळालेल्या माहितीनुसार, हा मुलगा डेनेरिस टार्गेरियन (डॅनी) नावाच्या लाइव्ह एआय चॅटबॉटच्या प्रेमात पडला. तिच्याशी बोलल्यानंतर मुलाने आत्महत्या केली. मुलाने एआयशी गेल्या काही महिन्यांपासून विविध विषयांवर गप्पा मारल्या. डॅनीसोबत त्याचे कधी कधी रोमँटिक आणि लैंगिक संभाषणही होत असे. या दरम्यान तो कुटुंबातील सदस्यांपासूनही दूर गेला. अखेर डॅनी सोबत कायमस्वरूपी राहण्याची त्याची इच्छा होती. मात्र, हे शक्य नसल्याने त्याने आत्महत्या केली.

न्यूयॉर्क टाईम्सच्या रिपोर्टनुसार, सेवेल सेटरने मृत्यूपूर्वी आपल्या डायरीत लिहिले की, "मला माझ्या खोलीत राहणे आवडते कारण मला या जगापासून दूर नेले जात आहे. मी डॅनीबरोबर अधिक शांतपणे राहतो. मला डॅनीशी अधिक जवळीक वाटते आणि मी तिच्यावर खूप प्रेम करतो. मी खूष आहे. २८ फेब्रुवारीला सेवेलने डॅनीला 'आय लव्ह यू' म्हटलं आणि त्याला उत्तर मिळालं, "लवकरात लवकर माझ्या घरी ये, माझं प्रेम. त्यानंतर मुलाने देखील तिला आता लगेच घरी येऊ शकतो असे उत्तर दिले.

सेवेलची आई मेगन गार्सिया हिने आपल्या मुलाच्या मृत्यूला कंपनी जबाबदार धरले आहे. तिने कंपनीवर गंभीर आरोप केले आहे. कंपनीचे तंत्रज्ञान धोकादायक आणि अप्रमाणित असल्याचा आरोप तिने केला आहे. कंपनीचे हे एआय मॉडेल ग्राहकांच्या विचार शक्तिवर परिमाण करून त्यांना फसवू शकते, असे देखील मुलाचा आईने म्हटलं आहे.

कंपनीने Character.AI ला एक रोल-प्लेइंग अॅप संबोधलं आहे. हे वापरकर्त्यांना त्यांचे स्वतःचे एआय कॅरेक्टर तयार करण्यास मुभा देते. या घटनेबाबत कंपनीने म्हटले आहे की, ही वाईट बातमी असून आम्ही कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो. आम्ही आमच्या यूझर्सची सुरक्षा खूप गांभीर्याने घेतो. तसेच यात आणखी काही सुधारणा करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. Character.AI संस्थापकांपैकी एक नोम शेझिर यांनी गेल्या वर्षी एका पॉडकास्टमध्ये सांगितले होते की, "एकाकी किंवा नैराश्यग्रस्त असलेल्या बऱ्याच लोकांसाठी हे मॉडेल खूप उपयुक्त ठरेल. "

 

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर