Women Marriage Biodata Viral Post: एक काळ असा होता की, पालकच आपल्या मुलांसाठी वधू किंवा वर शोधायचे. मात्र, तरुण-तरुणी स्वत:च आपले जोडीदार निवडतात. सध्या सोशल मीडियावर एक बायोडेटा व्हायरल होत आहे, ज्यात एका महिलेने तिच्या लग्नासाठी अशा काही अटी ठेवल्यात, जे वाचल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या व्हायरल होत असलेल्या बायोडेटावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.
@ShoneeKpoor या ट्विटर अकाऊंटवरून लग्नासाठी महिलेचा बायोडेटा शेअर केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिण्यात आले आहे की, 'तिचा पगार, दर्जा बघा आणि ती नवरा कसा शोधत आहे.' महिलेने बायोडेटामध्ये लिहिलेल्या गोष्टी वाचून सोशल मीडियावर विविध प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या पोस्टला आतापर्यंत १५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर, हजारो लोकांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या बायोडेटा एका शिक्षिकेचा आहे. तिने बीएड पदवी घेतली आहे. महत्त्वाचे म्हणजे, एक लाख ३० हजार तिचे वार्षिक उत्पन्न आहे. परंतु, ती लग्नासाठी अशी व्यक्ती शोधत आहे, ज्याचा वार्षिक उत्पन्न ३० लाख असेल. जर तो व्यक्ती परदेशात राहणारा असेल तर, त्याचे वार्षिक कमाई ८० लाख असावी. यासोबत मुलाकडे ३ बीएचके घर असावे. ज्यामुळे तिला आपल्या आई वडिलांना सोबत ठेवता येईल.
पुढे या महिलेने लग्नाच्या बायोडेटामध्ये काय लिहिले आहे, ते पाहून सगळेच चक्रावून गेले. तिला पंचतारांकित हॉटेलमध्ये राहायला आवडते, असे या महिलेचे म्हणणे आहे, घरातील काम करणे ही तिची जबाबदारी नाही, असेही तिने स्पष्ट केले आहे. तिला घरात स्वयंपाकी आणि मोलकरीण हवी आहे. या सर्व प्रकारानंतर या महिलेची इच्छा आहे की, तिच्या पतीने आपल्या आई-वडिलांना सोबत ठेवू नये.
या पोस्टवर एका व्यक्तीने आपली प्रतिक्रिया दिली आहे. महिलांना पण सासू-सासऱ्यांचा इतका त्रास का? स्वत: घटस्फोटित असूनही तिला अविवाहित नवरा हवा आहे. दुसऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की, तिचे आईवडील त्यांच्यासोबत राहिलेले चालतील, पण सासू- सासरे नको. या महिलेपेक्षा जास्त पगार शहरी भागातील मोलकरणी कमवतात, तरीही तिला लाखो कमवणारा व्यक्ती हवा आहे. आणखी एका जणाने लिहिले आहे की, या महिलेच्या खूप अपेक्षा आहेत. असे वाटत आहे की तिला लग्न करायचे नाही.