वक्फ बोर्डानं आख्ख्या गावावर हक्क सांगितला! भडकलेल्या ग्रामस्थांचा मुस्लिम नेत्यांवर हल्ला; तणाव वाढला
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  वक्फ बोर्डानं आख्ख्या गावावर हक्क सांगितला! भडकलेल्या ग्रामस्थांचा मुस्लिम नेत्यांवर हल्ला; तणाव वाढला

वक्फ बोर्डानं आख्ख्या गावावर हक्क सांगितला! भडकलेल्या ग्रामस्थांचा मुस्लिम नेत्यांवर हल्ला; तणाव वाढला

Nov 01, 2024 01:43 PM IST

waqf claims houses and land in karnataka haveri : कर्नाटकच्या हावेरीतील कडकोल गावात बुधवारी रात्री मोठा हिंसाचार झाला. या गावावर वक्फ बोर्डाने दावा केल्याने ग्रामस्थांनी वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांवर आणि मुस्लिम नेत्यांवर दगडफेक केली.

वक्फ बोर्डानं केला गावावर दावा! ग्रामस्थांनी मुस्लिम नेत्यांवर केला हल्ला; तणाव वाढला
वक्फ बोर्डानं केला गावावर दावा! ग्रामस्थांनी मुस्लिम नेत्यांवर केला हल्ला; तणाव वाढला

waqf claims houses and land in karnataka haveri : कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातील कडककोल गावात बुधवारी रात्री उशिरा वक्फ मालमत्ता परत घेण्याचे प्रशासकीय आदेश जारी करण्यात आल्याने गावात मोठा तणाव निर्माण झाला होता. गावातील जमिनी या ग्रामस्थांच्या मालकीच्या असतांना  वक्फ बोर्डाने त्यावर आपला दावा केल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते. तसेच मुस्लिम नेत्यांनी व अधिकाऱ्यांनी वक्फच्या नावावर मालमत्ता नोंदविण्यास मदत केल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी ताब्यात घेण्यासाठी आलेल्या वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांवर दगडफेक केली. या घटनेत काही जण जखमी झाले आहेत. त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

वक्फ आणि अल्पसंख्याक कल्याण मंत्री बी. झेड जमीर अहमद खान यांनी ३ सप्टेंबर रोजी एक बैठक घेतली ज्यात हावेरी जिल्हा प्रशासनाला कथित अतिक्रमित वक्फ जमीन ग्रामस्थांना रिकाम्या करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर प्रशासनाने ७ सप्टेंबर रोजी आदेश जारी केल्यानंतर हावेरीतील सावनूर तालुक्यातील कडकोल येथील ग्रामस्थ संतप्त झाले होते. अधिकाऱ्यांवर  हल्ला केल्याप्रकरणी काही जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

भाजप आमदार बसवगौडा आर. पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून हा अन्याय रोखण्यासाठी वक्फ मालमत्तेचे राष्ट्रीयीकरण आवश्यक असल्याचे म्हटले आहे. वक्फने  कर्नाटकातील शेतकरी, मठ आणि मंदिरांच्या जमिनीवर दावा केला आहे. वक्फने दावा केला आहे की,  सध्याच्या कायद्यामुळे वक्फकडे या जमिनी ताब्यात घेण्याचे अधिकार आहेत. 

शेतजमिनींसह हिंदू मंदिरांची देखील वक्फ मालमत्ता म्हणून नोंद केल्याचा आरोप  कर्नाटक भाजपने राज्य सरकारवर केला आहे. पक्षाचे विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी आणि मंदिरांच्या मालमत्तेवरील कथित अतिक्रमणाबद्दल वक्फ बोर्ड आणि राज्य सरकार या दोघांनाही लक्ष्य करत ४ नोव्हेंबर रोजी महत्त्वपूर्ण निदर्शने करण्याची घोषणा केली. गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना अशोक म्हणाले, 'विजयपुरापाठोपाठ कोलारमधील मंदिरांच्या मालमत्तेला वक्फ मालमत्ता म्हणून चिन्हांकित केले जात आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी आणि हिंदू मंदिरे या दोन्हींवर हे स्पष्ट अतिक्रमण आहे. "

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर