manipur violence : मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच! जमावाचा पोलिसांवर गोळीबार; एकाची हत्या-violence flares up again in manipur firing on police force murder of a person ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  manipur violence : मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच! जमावाचा पोलिसांवर गोळीबार; एकाची हत्या

manipur violence : मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच! जमावाचा पोलिसांवर गोळीबार; एकाची हत्या

Dec 31, 2023 08:49 AM IST

manipur violence : मणिपूरच्या मोरेह जिल्ह्यात शनिवारी मोठा हिंसाचार उफाळला. एकाने थेट पोलिसांवर हल्ला केला. तर जमावाने दगडफेक केली.

manipur violence
manipur violence

Manipur Violence : मणिपूरच्या मोरेह जिल्ह्यात पुन्हा एकदा हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. काही अज्ञात हल्लेखोरांनी पोलिस दलावर हल्ला केला. यामध्ये एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला आहे. तर एका नागरिकांचा मृत्यू झाला. काही नागरिकांनी दगडफेक आणि जाळपोळ देखील केल्याचे वृत्त आहे.

Waluj MIDC Fire : वाळूज एमआयडीसीत अग्नितांडव, हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, ६ कामगारांचा जळून मृत्यू

शनिवारी दुपारी ३.५० च्या सुमारास मणिपूरच्या मोरेह येथे काही बंदूकधारी आणि पोलीस कमांडो यांच्यात जोरदार गोळीबार झाला. मोरेह की लोकेशन पॉइंट (KLP) कडे कमांडो यांना घेऊन जाणाऱ्या वाहनांना हल्लेखोरांनी लक्ष्य केले. या घटनेची माहिती देतांना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, इम्फाळ-मोरेह मार्गावरील एम चाहनौ गाव ओलांडताना हा हल्ल्या झाला. यात पोलीस जखमी झाला. जखमी पोलीस कर्मचाऱ्यावर आसाम रायफल्सच्या पाच कॅम्पस येथे उपचार सुरू आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले. प्राथमिक माहितीनुसार, न्यू मोरेह आणि एम चाहोन गावाच्या प्रवेशद्वाराजवळ अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. मोरेह येथेही दोन घरांना आग लावल्याची घटना देखील उघडकीस आल्या आहेत.

गावाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या व्यक्तीची हत्या

इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील कडंगबंद गावाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका व्यक्तीची शनिवारी पहाटे ३.३० च्या सुमारास अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. जेम्सबोड निंगोम्बम असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो गावाच्या रक्षणासाठी तैनात होता. यावेळी काही हल्लेखोरांनी गोळीबार करून त्याला ठार केले. निंगोम्बम यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील प्रादेशिक वैद्यकीय विज्ञान संस्थेत आणण्यात आला. कडंगबंद हे कांगपोकपी जिल्ह्याच्या सीमेवर आहे, ज्यात ३ मे रोजी राज्यात वांशिक हिंसाचार सुरू झाल्यापासून वारंवार हिंसाचाराच्या घटना घडत आहेत.

Whats_app_banner
विभाग