नरेंद्र मोदींचा फोन आला होता, पण मी बोलले नाही, कारण... विनेश फोगाट हिचा मोठा गौप्यस्फोट-vinesh phogat claims i received a call from prime minister narendra modi but i did not talk to him here is the reason ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  नरेंद्र मोदींचा फोन आला होता, पण मी बोलले नाही, कारण... विनेश फोगाट हिचा मोठा गौप्यस्फोट

नरेंद्र मोदींचा फोन आला होता, पण मी बोलले नाही, कारण... विनेश फोगाट हिचा मोठा गौप्यस्फोट

Oct 02, 2024 12:36 PM IST

Vinesh Phogat on Narendra Modi call : पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये अपात्र ठरल्यानंतर मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन आला होता, पण त्यांच्याशी बोलण्यास नकार दिला, असं विनेश फोगाट हिनं म्हटलं आहे. त्याचं कारणही तिनं सांगितलं आहे.

नरेंद्र मोदींचा फोन आला होता, पण मी बोलले नाही, कारण... विनेश फोगाट हिचा मोठा गौप्यस्फोट
नरेंद्र मोदींचा फोन आला होता, पण मी बोलले नाही, कारण... विनेश फोगाट हिचा मोठा गौप्यस्फोट

Vinesh Phogat on Narendra Modi call : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकापासून वंचित राहावं लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्या बोलू इच्छित होते. मी तयारी दाखवली, पण संभाषणासाठी ठेवलेल्या अटींमुळं मी बोलण्यास नकार दिला, असा गौप्यस्फोट भारताची माजी कुस्तीपटू विनेश फोगाट हिनं केला आहे. त्या अटी काय होत्या हेही तिनं सांगितलं आहे.

पॅरिस ऑलिम्पिक गाजवणारी, पण तांत्रिक गोष्टींमुळं पदकापासून वंचित राहिलेली भारताची माजी महिला कुस्तीपटू विनेश फोगाट आता राजकीय आखाड्यात उतरली आहे. काँग्रेसच्या तिकिटावर ती हरयाणा विधानसभेची निवडणूक लढवत आहे. या पार्श्वभूमीवर लल्लन टॉप या न्यूज पोर्टलशी बोलताना तिनं त्यावेळी घडलेला एक किस्सा सांगितला.

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये ५० किलो वजनी गटाच्या फायनल सामन्याच्या दिवशी वजन थोडं जास्त भरल्यानं तिला अपात्र ठरवण्यात आलं. त्यामुळं ती प्रचंड निराश झाली होती. त्यावेळी पंतप्रधान मोदी हे तिच्याशी फोनवर बोलू इच्छित होते, असं विनेश मुलाखतीत म्हणाली. ती म्हणाली, पंतप्रधानांनी थेट फोन केला नाही. ऑलिम्पिक स्क्वॅडमधील अधिकाऱ्यांना फोन आला होता. पंतप्रधानांना तुमच्याशी बोलायचं आहे असं मला सांगण्यात आलं. मी म्हटलं ठीक आहे. पण बोलण्यासाठी त्यांनी माझ्यासमोर एक अट ठेवली की, फोन सुरू असताना तुमच्यासोबत इतर कोणी नसेल. फक्त दोन अधिकारी असतील. एक जण तुमचं मोदींशी बोलणं करून देईल आणि दुसरा व्हिडिओ शूट करेल. नंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जाईल. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करण्याला माझा विरोध होता. त्यामुळं मी बोलण्यास नकार दिला, असं विनेश म्हणाली.

मी दोन वर्षांचा हिशेब मागितला असता!

'माझ्या आतापर्यंतच्या कष्टाचं… मला माझ्या भावनांचं आणि वेदनांचं सोशल मीडियावर प्रदर्शन करायचं नव्हतं. त्यांना खरोखरच एखाद्या खेळाडूबद्दल सहानुभूती असेल तर ते रेकॉर्डिंगशिवाय बोलू शकले असते. त्यांचे आभारच मानायला हवेत. कदाचित त्यांना लक्षात आलं असेल की जेव्हा कधी विनेशशी चर्चा होईल, तेव्हा ती दोन वर्षांचा हिशेब नक्कीच विचारेल (कुस्तीपटूंची निदर्शनं, पोलिसांकडून झालेली मारहाण आणि डब्ल्यूएफआय प्रमुखांवरील आरोप) त्यामुळंच त्यांनी माझ्या फोनवरून बोलण्याऐवजी अधिकाऱ्यांचा फोन वापरायला सांगितला. त्यांच्या फोनवर झालेलं रेकॉर्डिंग ते त्यांना हवं तसं कापू शकले असते. पण मी तसं केलं नसतं. मी जे काही बोलणं झालं ते टाकलं असतं हे कळल्यानं त्यांनी अटी ठेवल्या असाव्यात, असं विनेश म्हणाली.

काय झालं होतं त्या दोन वर्षांत?

दोन वर्षांपूर्वी विनेश फोगाट, बजरंग पुनिया व साक्षी मलिकसह इतर कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व भाजपचे खासदार बृजभूषणसिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यांच्याविरोधात आंदोलन सुरू केलं होतं. हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला होता. दुसरीकडं बृजभूषणसिंह यांच्या विरोधात कुठलीही ठोस कारवाई झाली नाही. सरकारच्या संमतीशिवाय पोलिसांनी ते करणं शक्य नव्हतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली होती. या स्पर्धेत तिनं फायनलपर्यंत मजल मारली होती. मात्र तांत्रिक बाबींमुळं ती अपात्र ठरली. त्यानंतर तिनं कुस्तीतून निवृत्ती घेतली आणि आता ती हरयाणा विधानसभा निवडणूक लढवत आहे.

Whats_app_banner