बाबो..! अचानक आलेल्या पुरामुळे संपूर्ण गावच गेलं वाहून; १५५ जणांचा मृत्यू तर अनेक जण बेपत्ता-vietnam flood trekking suspended amid deadly floods and landslides village swept away many people died ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  बाबो..! अचानक आलेल्या पुरामुळे संपूर्ण गावच गेलं वाहून; १५५ जणांचा मृत्यू तर अनेक जण बेपत्ता

बाबो..! अचानक आलेल्या पुरामुळे संपूर्ण गावच गेलं वाहून; १५५ जणांचा मृत्यू तर अनेक जण बेपत्ता

Sep 11, 2024 07:04 PM IST

Vietnamflood : यागी चक्रीवादळामुळे अनागोंदी माजली असून उत्तर व्हिएतनामला भीषण पुराचा सामना करावा लागत असल्याने प्रवास स्थगित करावा लागला आहे. त्यातच अचानाक आलेल्या पुराने संपूर्ण गाव वाहून गेलं आहे.

अचानक आलेल्या पुरात संपूर्ण गावच वाहून गेलं
अचानक आलेल्या पुरात संपूर्ण गावच वाहून गेलं (Photo by Huu Hao / AFP)

उत्तर व्हिएतनाममध्ये यागी चक्रीवादळाने कहर केला आहे. यामुळे झालेल्या भूस्खलन आणि आणि अचानक आलेल्या महापुराने संपूर्ण गाव वाहून गेले आहे. येथे १५५ लोकांचा मृत्यू झाला असून १४१ लोक बेपत्ता झाले आहेत. शेकडो लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

महापुराने ३५ कुटूंबांना ढिगाऱ्याखाली केले दफन

लाओ काई प्रांतात आलेल्या महापुराने मंगळवारी ३५ कुटूंबांचे वास्तव्य असलेल्या लँग नु गावाला दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली दफन केले. यातील केवळ डझनभर लोकच जिवंत राहिले आहेत. बचाव पथकाने केवळ ३० मृतदेह बाहेर काढले आहेत. यागी गेल्या अनेक दशकांतील सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ आहे. १४९ ताशी वेगाने वारे वाहत हे शनिवारी व्हिएतनामला धडकले.

रविवारी चक्रीवादळ कमजोर पडले असले तरी मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे देशातील नद्या धोकादायक पातळीवरून वाहत आहेत. एक टूर गाइड वान ए पो यांनी सांगितले की, भूस्खलन आणि मुसळधार पावसामुळे देशातील अनेक रस्ते वाहून गेले असून हवामानामुळे सर्व प्रवास बंद करावा लागला आहे. त्याचबरोबर सर्व ट्रेकिंग बंद करण्यात आले आहे.

सोमवारी को फु थो प्रांतात लाल नदीवरील पूल कोसळला होता. यामध्ये दोन मोटरसायकली,  १० कार आणि ट्रक नदीत कोसळली होती. डोंगराळ भागातील बांग प्रांतात भूस्खलनामुळे २० लोकांना घेऊन जाणारी बस महापुरात वाहून गेली होती.

व्हिएतनामचे सरकारी प्रसारक व्हीटीव्हीने सांगितले की, लाओ काई प्रांतातील एका डोंगरावरून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे ३५ कुटुंबांसह लँग नू वस्ती चिखल आणि ढिगाऱ्याखाली गाडली गेली. आतापर्यंत केवळ डझनभर लोक जिवंत असल्याचे समजते. बचाव पथकाला २२ मृतदेह सापडले असून ७० जणांचा शोध सुरू आहे.

यागी चक्रीवादळ आणि त्यानंतर झालेल्या मृत्यूंची संख्या १५५ वर पोहोचली आहे. तर ६९ जण बेपत्ता असून शेकडो जण जखमी झाल्याची माहिती आहे. पूर आणि भूस्खलनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत, त्यापैकी बरेच लोक चीनच्या सीमेला लागून असलेल्या वायव्य लाओ काई प्रांतात आले आहेत, जिथे लँग नू स्थित आहे. लाओ काई प्रांतात सापा हे लोकप्रिय ट्रेकिंग डेस्टिनेशन देखील आहे.

भूस्खलन आणि मुसळधार पावसामुळे प्रांतातील अनेक रस्ते बंद झाले आहेत, अशी माहिती सापा टूर गाईड व्हॅन ए पो यांनी दिली. हवामानामुळे त्यांना प्रवास मर्यादित करणे भाग पडले असून सर्व ट्रेकिंग स्थगित करण्यात आले आहे.

पर्यटन हे स्थानिक अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे साधन असून या उद्योगातील अनेकजण अडकून पडले आहेत. एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या गुयेन व्हॅन लुओंग यांनी सांगितले की, सापा ते त्यांच्या गावापर्यंतचा १५ किलोमीटरचा रस्ता वाहन चालविण्यासाठी धोकादायक असल्याने ते घरी परत येऊ शकले नाहीत.

आग्नेय आशियाई देशात गेल्या काही दशकांतील यागी हे सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ होते. ताशी १४९ किमी (९२ मैल) वेगाने वारे वाहत हे चक्रीवादळ शनिवारी धडकले. रविवारी पावसाचा जोर कमी झाला असला तरी पावसाचा जोर कायम असून नद्या धोकादायक आहेत.

Whats_app_banner