Viral News: सोशल मीडियाच्या जगात आपल्याला कधी काय पाहायला मिळेल, याचा काही नेम नाही. अनेकदा लोक रील बनवण्यासाठी,सोशल मीडियावर लाईक्स मिळवण्यासाठी कोणत्या थराला जातील, हे सांगता येत नाही. विषेषत: तरूणांमध्ये असे धोकादायक स्टंट करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एक तरुण ३० फूट उंच साईनबोर्डाला लटकून पुल-अप करताना दिसतोय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ उत्तर प्रदेशातील अमेठी येथील आहे. राष्ट्रीय महामार्गावर शूट करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये एक अज्ञात तरुण अंगावरचे शर्ट काढून साईनबोर्डवर पुल-अप करताना दिसत आहे. साईनबोर्डवर ६ किलोमीटर अंतरावर मुंशीगंज असे लिहिले. तर, अमेठी ३.५ किलोमीटर अंतरावर असे लिहिल्याचे दिसत आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांचे गाणे वाजत आहे.
AmethiliveCom या ट्विटर हँडलवरू हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, 'अमेठीच्या रस्त्यांवर खतरों की खिलाडी, एक तरुण राष्ट्रीय महामार्गावरील ३० फूट उंच साईनबोर्डवर पुल-अप करताना दिसत आहे. सचिन नावाच्या इन्स्टाग्राम आयडीवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.' हा व्हिडिओ ६ हजारांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत.
व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका युजरने म्हटले आहे की, 'या व्यक्तीला यूपी पोलिसांनी लवकरात लवकर अटक करण्याची गरज आहे, जेणेकरून त्याला धडा शिकवता येईल. ‘ व्हिडिओतील तरुणाला रील बनवण्याची खूप आवड आहे. अजून पोलिसांच्या कारवाईला सामोरे गेला नाही. एकदा तो पोलिसांना भेटला की, रील्स बनवणे कायमचे विसरून जाईल.’
अमेठी पोलिसांनीही या व्हिडिओची दखल घेतली असून योग्य तपासानंतर त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. हे प्रकरण अमेठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. व्हायरल व्हिडिओची चौकशी केली जात आहे, चौकशीनंतर स्टंट करणाऱ्या तरुणांविरोधात आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.