मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: उकळत्या तेलात पडता पडता वाचलं बाळ, पालकांची मस्ती पाहून नेटकरी संतापले

Viral Video: उकळत्या तेलात पडता पडता वाचलं बाळ, पालकांची मस्ती पाहून नेटकरी संतापले

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 13, 2024 08:17 PM IST

Baby Falling Near Boiling Oil: या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Viral Video
Viral Video

Baby Viral Video: पालकांच्या हलगर्जीपणा त्यांचे चिमुकले बाळ उकळत्या तेलात पडता पडता थोडक्यात वाचले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. डोळ्यात अंजन घालून लहान मुलांकडे लक्ष द्यावे लागते. मात्र, या व्हायरल व्हिडिओत याउलट दिसत आहे. ज्या लोकांच्या घरात लहान मुले आहेत, त्यांनी वेळ काढून ही बातमी वाचली पाहिजे.

व्हायरल व्हिडिओत पाहू शकता की, घरात काहीतरी कार्यक्रम असल्याचे दिसत आहे, जिथे एक तरुणी नाचतानाही दिसत आहे. तर, तिच्यामागे एक महिला तिच्या बाळाला घेऊन उभा आहे. तिच्या बाजुला काही मंडळी भल्यामोठ्या भांड्यांमध्ये जेवण बनवत आहेत. तेवढ्यात एक तरूण महिलेच्या जवळ येतो आणि तिला उचलून घेतो. मात्र, त्यावेळी तिच्या हातातील बाळ सटकून उकळते तेल असलेल्या कढईच्या शेजारी पडते. हे पाहून अनेकजण शॉक झाले.

Mumbai Metro: डोक्यावर टोपी, तोंडाला मास्क; बॉलिवूड सुपरस्टारचा लपूनछपून मेट्रोने प्रवास

हा थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. लहान मुलांना तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपावे लागते. दरम्यान, आई- वडिलांचा हलगर्जीपणा पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

WhatsApp channel

विभाग