VIDEO : आकाशात झेपावताच विमानातून उडू लागल्या आगीच्या ठिणग्या, भयंकर घटना कॅमेऱ्यात कैद-video shows sparks coming out of united airlines boeing 777 after facing technical glitch ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  VIDEO : आकाशात झेपावताच विमानातून उडू लागल्या आगीच्या ठिणग्या, भयंकर घटना कॅमेऱ्यात कैद

VIDEO : आकाशात झेपावताच विमानातून उडू लागल्या आगीच्या ठिणग्या, भयंकर घटना कॅमेऱ्यात कैद

Sep 22, 2022 07:11 PM IST

अमेरिकेतून ब्राझीलला जाणाऱ्या एका विमानात अचानक ठिणग्या पडू लागल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

आकाशात झेपावताच विमानातून उडू लागल्या ठिणग्या
आकाशात झेपावताच विमानातून उडू लागल्या ठिणग्या

अमेरिकेतून ब्राझीलला जाणाऱ्या एका विमानात अचानक ठिणग्या पडू लागल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत दिसते की, विमानाने हवेत उड्डाण घेताच विमानातून आगीच्या ठिणग्या उडू लागल्या. ही घटना अमेरिकेतील नेवार्कहून ब्राझीलमधील साओ पाउलो शहराकडे जाणाऱ्या यूनाइटेड एअरलाइन्स बोइंग ७७७-२०० विमानात घडली. N787UA नंबरने नोंदणीकृत विमानात बुधवारी नेवार्क विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर तात्काळ ठिणग्या उडाल्याचे दिसून आले.

रिपोर्टनुसार, वैमानिकांनी प्रसंगावधान दाखवत अटलांटिक महासागराच्या वरून एका होल्डिंग पॅटर्नमधून उड्डाण केले. उड्डाण केल्यानंतर जवळपास दीड तासांनी विमान परत नेवार्क विमानतळावर सुरक्षित लँड केले गेले. हा व्हिडिओ पाहून लोक घाबरले आहेत. सोशल मीडिया वर लोक एअरलाइन प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप करत आहेत.

 

एअरो एक्सप्लोरच्या रिपोर्टनुसार, हे यूनाइटेड एअरलाइन्सचे विमान होते. जे नेवार्कहून ब्राझीलमधील साओ पाउलोकडे जात होते. एअरो एक्सप्लोररने पुढे म्हटले आहे की, विमान बोइंग ७७७-२००ER होते. हे विमान टेक-ऑफ केल्यानंतर दीड तासात नेवार्कला परत आले. या घटनेचे कारण अद्याप समोर आले नाही. मात्र जुन्या विमानांमुळे अशा घटना घडत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे यूनायटेड कंपनीने डझनभर बोइंग७३७ मॅक्स विमाने खरेदी करण्याची ऑर्डर दिली आहे. ही विमाने २०२३ मध्ये एअरलाईन्सच्या ताफ्यात सामील होतील.

 

संबंधित बातम्या