Viral Video: रुळांमध्ये अडकलेल्या चाकरमान्याला वाचवण्यासाठी मुंबईकरांनी ढकलली लोकल ट्रेन-video passengers push mumbai local train to save man trapped in tracks ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: रुळांमध्ये अडकलेल्या चाकरमान्याला वाचवण्यासाठी मुंबईकरांनी ढकलली लोकल ट्रेन

Viral Video: रुळांमध्ये अडकलेल्या चाकरमान्याला वाचवण्यासाठी मुंबईकरांनी ढकलली लोकल ट्रेन

Feb 10, 2024 11:44 AM IST

Mumbai Local Viral Video: नवी मुंबईच्या वाशी रेल्वे स्थानकावरील हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Viral Video
Viral Video

Vashi Station Viral Video: मुंबईतील वाशी स्थानकावरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओत मुंबईकरांनी रुळांमध्ये अडकलेल्या चाकरमान्याला वाचवण्यासाठी चक्क लोकल ट्रेन ढकलली. एका प्रवाशाने हा संपूर्ण प्रकार त्याच्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केला आहे. या

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ ४१ सेंकदाचा आहे. या व्हिडिओमध्ये अनेक प्रवासी लोकल मोटरमनच्या केबिनभोवती जमताना दिसत आहेत. तर, काहीजण लोड केलेल्या ट्रेनच्या डब्याला दुसऱ्या बाजूला ढकलताना आणि खाली अडकलेल्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

Reddit वर व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या युजरने दावा केला आहे की तो स्वतः या घटनेचा साक्षीदार आहे. पनवेलला जाणाऱ्या लोकल ट्रेनखाली एक प्रवासी पडून अडकल्याचे त्याने सांगितले. “जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करत होतो, तेव्हा लोक ट्रेनला धक्का देत होते. नंतर सर्वांनी सहकार्य केले आणि एकाच वेळी ट्रेन ढकलली आणि संबंधित प्रवाशाला बाहेर येण्यास मदत केली.”

वापरकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत रुळांमध्ये अडकलेल्या व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली आहे. या व्यक्तीच्या घोट्याला सूज आली आहे. पण सध्या तो ठिक आहे. कदाचित हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल, परंतु या व्हिडिओमध्ये हे दिसून येते की जर आपण एकत्र काही केले तर त्यात आपल्याला नक्कीच यश मिळते.

Whats_app_banner