Fact Check News: सध्या सोशल मीडियावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा एक व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे, ज्यात त्यांनी चक्क काँग्रेस नेते राहुल गांधींना नालायक म्हटले आहे. एवढेच नव्हेतर, राहुल गांधींना मारले पाहिजे, असेही ते बोलताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीत एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून लढले आणि आता उद्धव ठाकरे हे राहुल गांधींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य का करत आहेत? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, यामागचे सत्य समोर आले असून व्हायरल होत असलेला व्हिडिओ जुना आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये उद्धव ठाकरे म्हणत आहेत की, "मी असा एकमेव व्यक्ती आहे, ज्याने राहुल गांधींना नालायक म्हटले आणि त्यांना भररस्त्यात जोड्याने मारले पाहजे." उद्धव ठाकरेंचा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे म्हटले आहे की, त्यांनी बंद दराआड राहुल गांधींसोबत काय केले असेल? याचा विचार करून अंगाचा थरकाप उडत आहे. त्यांनी खरेच राहुल गांधींसोबत तसेच काही केले नाही ना, जसे उद्धव ठाकरेंनी वक्तव्य केले.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यासह एकूण २४ पक्षांनी युती करून इंडिया आघाडीची स्थापना केली. याशिवाय, निवडणुकीत एकत्रित निवडणूक लढल्या. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने २२ पैकी ४८ जागा जिंकल्या.
या व्हिडिओमागील सत्य तपासले असता हा व्हिडिओ जुलै २०१९ मधील आहे. तर, इंडिया आघाडीची स्थापना जुलै २०२३ मध्ये झाली. हा व्हायरल व्हिडिओ जवळपास चार वर्षे जुना आहे. इंडिया आघाडीची स्थापना होण्यापूर्वी राहुल गांधींनी हिंदुत्व नेते आणि स्वातंत्र्यसेनानी वीर सावरकर यांचा अपमान केला होता. यावर उद्धव ठाकरेंनी आपली प्रतिक्रिया दिली होती. वीर सावरकर आमचे देव आहेत आणि त्यांचा अनादर आम्ही मान्य करणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. तसेच राहुल गांधी हे नालायक असून त्यांना भररस्त्यात जोड्याने मारले पाहिजे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला होता. उद्धव ठाकरेंचे संपूर्ण भाषण पाहण्यासाठी येथे क्लिक करा
निष्कर्ष- उद्धव ठाकरेंनी राहुल गांधीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा व्हिडिओ जुना आहे. नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
डिस्क्लेमर: हे वृत्त मुळात Boom ने प्रकाशित केले. ‘शक्ती कलेक्टिव्ह'चा एक भाग म्हणून एचटी डिजिटलने ते पुन्हा प्रकाशित केले आहे.
संबंधित बातम्या