मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  विद्यार्थ्याने शिक्षिकेसोबत शाळेतच केला रोमँटिक डान्स; Viral Video पाहून लोकांच्या गंमतीशीर कमेंट

विद्यार्थ्याने शिक्षिकेसोबत शाळेतच केला रोमँटिक डान्स; Viral Video पाहून लोकांच्या गंमतीशीर कमेंट

May 24, 2024 07:43 PM IST

Dance viral Video : एक विद्यार्थी आपल्या शिक्षिकेसोबत बॉलीवूडच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी वर्गात अन्य विद्यार्थीही उपस्थित असून काही जण आपल्या कामात दंग आहेत तर काही जण या दोघांचा डान्स पाहात आहेत.

विद्यार्थ्याने शिक्षिकेसोबत शाळेतच केला रोमँटिक डान्स
विद्यार्थ्याने शिक्षिकेसोबत शाळेतच केला रोमँटिक डान्स

Student dancing with female teacher : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम असो किंवा ट्विटर प्रत्येक ठिकाणी व्हायरल व्हिडिओची लाईन लागलेली असते. या प्लॅटफॉर्म्सवर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंची वेगवेगळी कॅटेगरी असते. कधी बस व ट्रेनमध्ये जागेसाठी भांडणारे लोक, तसेच कधी पब्लिक प्लेसमध्ये अश्लील कृत्ये करताना प्रेमी युगुलांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्याचबरोबर विविध प्रकारचे टँलेंट दाखवतानाचे व्हिडिओही व्हायरल (viral Video) होत असतात व नेटीझन्स यावर प्रतिक्रिया देत असतात.

ट्रेंडिंग न्यूज

काही दिवसांपूर्वी कर्नाटकातील एका शाळेच्या सहलीदरम्यान विद्यार्थी व शिक्षिकेचा डान्स (female teacher student dance) व्हायरल झाला होता. त्यावेळी विद्यार्थ्याने या शिक्षिकेला उचलून घेतले होते तसेच दोघेजण एकमेकांचे चुंबन घेतानाचे फोटोही व्हायरल झाले होते. आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, एका शाळेतील वर्ग सजवला गेला आहे. वर्गातील बोर्डावर फेअरवेल लिहिले आहे. त्यामुळे या वर्गात फेअरवेल पार्टी असल्याचे व त्यामुळे वर्ग सजवल्याचे समजते.

त्याचबरोबर व्हिडिओमध्ये अजूनही काही दिसते. एक विद्यार्थी आपल्या शिक्षिकेसोबत बॉलीवूडच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी वर्गात अन्य विद्यार्थीही उपस्थित असून काही जण आपल्या कामात दंग आहेत तर काही जण या दोघांचा डान्स पाहात आहेत. विद्यार्थी व महिला शिक्षिका एकमेकांना चिटकून खूपच रोमँटिंक अंदाजात डान्स करत आहेत.

हा व्हिडिओ मायक्रो ब्लॉगिंग प्लेटफॉर्म एक्स वर@BabaXwale नावाच्या अकाउंटवरून शेअर केला होता. व्हिडियो शेअर करताना कॅप्शन लिहिले होते की,'आमच्या शाळेत असे का होत नव्हते' व्हिडिओ पाहून अन्य यूजर्संनीही कमेंट केल्या आहेत. एका यूजरने लिहिले मला पुन्हा शाळेत जायचे आहे. दूसऱ्या यूजरने लिहिले की, चला बाबा पुन्हा शाळेत जाऊया. अन्य एका तिसऱ्या यूजरने लिहिले की, आमच्या क्लासच्या सर्व मॅडम ४०-५० प्लस होत्या. अन्य एका युजरने लिहिले की, काय काय पाहवे लागत आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग