Funny Viral Video: ग्रामीण भागात लोकांच्या घरात किंवा आजूबाजूच्या भागात अनेकदा साप दिसतात. अशा घटनेचे व्हिडीओही व्हायरल होत असतात. तुम्ही सापांचे असे अनेक व्हिडीओ पाहिले असतील, पण तुम्ही कोणी सापाला चप्पल चोरताना पाहिला आहे का? तुम्ही पाहिला नसेल तर आत्ताच बघाच, कारण सोशल मीडियावर चप्पल चोर सापाचा एक अनोखा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये साप तोंडात चप्पल घेऊन पळताना दिसत आहे. आता या चप्पलचं साप काय करेल हे फक्त त्यालाच माहीत आहे, पण हा व्हिडीओ पाहून लोकांना आपल्या हशावर नियंत्रण ठेवता येत नाहीये.
भारतीय वन सेवेचे अधिकारी प्रवीण कासवान यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. यासोबत त्याने कॅप्शन लिहिले आहे 'मला आश्चर्य वाटते की साप त्या चप्पलचे काय करेल, त्याला पायही नाहीत.'
बघा व्हायरल व्हिडीओ
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक महाकाय साप तोंडात चप्पल घेऊन पळताना दिसत आहे. प्रथम, साप विटांमधून बाहेर पडतो आणि घराकडे जातो, तेव्हाच त्याला एक चप्पल सापडते, जी तो तोंडात दाबतो आणि वेगाने पळू लागतो. यानंतर थोडं अंतर गेल्यावर तो चप्पल घेऊन झुडपात शिरतो आणि पाहताच डोळ्यांसमोरून दिसेनासा होतो.
नेटिझन्सच्या प्रतिक्रिया
सुमारे ३० सेकंदांच्या या व्हिडीओला आतापर्यंत १०३ हजार व्ह्यूज मिळाले आहेत. ही प्रतिक्रिया देताना एका यूजरने लिहिले आहे - त्या सापांने तर स्वतःची इज्जतच काढली तर, दुसऱ्या यूजरने त्याला चप्पल चोर साप म्हटले आहे.
संबंधित बातम्या