Viral News: इंडिगोच्या विमानात चहा विकणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काळ्या रंगाचे जॅकेट घातलेला एक व्यक्ती डिस्पोजेबल कपमध्ये सहप्रवाशांना चहा देत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. या व्यक्तीने थर्मल फ्लास्कमध्ये चहा आणला आहे. बस आणि ट्रेनमध्ये चहा विकणाऱ्यांना सगळ्यांनीच पाहिले आहे. परंतु, विमानात चहा विकणाऱ्याला पाहू अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.
इन्स्टाग्रामवर aircrew.inअकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्याला जवळपास ९ हजार ५९० लाईक्स आणि शेकडो कमेंट्स मिळाल्या आहेत. हा व्हिडिओ नेमका कधीचा आणि कुठला आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणी एअरलाइन्सकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही.
या व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी दिलेल्या विनोदी प्रतिक्रिया पाहून हासू आवरणार नाही. ‘हा माणूस गणवेशात का नाही? त्यामुळे अनप्रोफेशनल आहे,’ असा सवाल एका इन्स्टाग्राम युजरने केला आहे. ‘लवकरच मुग फली वाला चाट मसाला येणार आहे’, अशी कमेंट आणखी एका युजरने केली आहे. तिसऱ्या युजरने म्हटले आहे की, काही वेळाने गुटखा विकणाराही येईल. तर, काही जणांनी या व्हिडिओवर संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे. एका इन्स्टाग्राम युजरने एअरलाईनचे नाव बदलून 'ट्रेनडिगो' अशी कमेंट केली आहे.
एका युजरने म्हटले आहे की ‘विमानात १०० मीलिपेक्षा जास्त चहा घेऊन जायला परवानगी नाही. मग या व्यक्तीने चहाने भरलेली बॉटल कशी नेली?’ आणखी एका जणाने ‘इंडिगोने पुरुष क्रू ची नेमणूक कधीपासून सुरू केली?’, अशी प्रतिक्रिया दिली. ही लग्नाची प्लाइट असावी वाटते, कदाचिक ते सर्वजण लग्नाला जात असतील, असे एका व्यक्तीने म्हटले आहे. आणखी एका व्यक्तीने असे म्हटले आहे की, ‘ एअर इंडियाने एअर होस्टेसची नेमणूक थांबवावी, त्याऐवजी अनुभवी बस कंडक्टर घ्यावेत.’
संबंधित बातम्या