Viral Video: लखनौच्या ‘मॉडेल चायवाली’चा व्हिडिओ व्हायरल, अवघ्या चार दिवसांत १० लाखांहून अधिक व्ह्यूज
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: लखनौच्या ‘मॉडेल चायवाली’चा व्हिडिओ व्हायरल, अवघ्या चार दिवसांत १० लाखांहून अधिक व्ह्यूज

Viral Video: लखनौच्या ‘मॉडेल चायवाली’चा व्हिडिओ व्हायरल, अवघ्या चार दिवसांत १० लाखांहून अधिक व्ह्यूज

Oct 08, 2024 01:24 PM IST

Lucknow Model Chai Wali Video: लखनौच्या ‘मॉडेल चायवाली’चा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.

लखनौच्या ‘मॉडेल चायवाली’चा व्हिडिओ व्हायरल
लखनौच्या ‘मॉडेल चायवाली’चा व्हिडिओ व्हायरल (Instagram/@thehungrypanjabi_)

Viral News: सिमरन गुप्ता उर्फ 'मॉडेल चाय वाली'चा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. चार दिवसांत त्याला ११ दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. फूड ब्लॉगिंग चॅनेल द हंग्री पंजाबीने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये सौंदर्य स्पर्धा विजेती आणि उद्योजक सिमरन गुप्ता आपल्या चहाच्या टपरीवर चहा बनवताना दिसत आहे.

चहा विक्रीला ट्रेंडी बिझनेस व्हेंचरमध्ये रूपांतरित करणाऱ्या छोट्या उद्योजकांच्या  यादीत गुप्ता यांचा समावेश आहे. नागपूरची डॉली चायवाला आणि प्रफुल्ल बिल्लोरे ऊर्फ एमबीए चायवाला यांसारख्या चायविक्रेत्यासह सिमरन देखील तितकीच प्रसिद्ध आहे.

सिमरन गुप्ताने २०१८ मध्ये मिस गोरखपूरचा किताब जिंकल्यानंतर मॉडेलिंगमध्ये हात आजमावला आहे. 'मिस गोरखपूर झाल्यानंतर तिचे मनोबल खूप वाढले. तिला मॉडेलिंगच्या ऑफर्स येऊ लागल्या. यानंतर ती दिल्लीला गेली.  तिने काही जाहिरातींमध्येही काम केले. पंरतु, कोरोना महामारीत तिचे काम ठप्प झाले आणि तिला आर्थिक संकटाला सामोरे जावा लागले.  त्यानंतर ती पुन्हा आपल्या मूळ गावी गोरखपूर येथे परतली, असे तिने एकदा द बेटर इंडियाला सांगितले होते.

संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी तिच्यावर असल्याने तिने व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि तिने चायची टपरी सुरू केली. लखनौमध्ये चहाचे दुकान उघडताना एमबीए चायवाला प्रफुल्ल बिल्लोर आणि पाटणा ग्रॅज्युएट चहा विक्रेत्या प्रियांका गुप्ता यांच्यापासून प्रेरणा मिळाली, असेही तिने सांगितले.

तीन मुलांच्या आईने गळ्यात लोखंडी रॉप खुपसून केली प्रियकराची हत्या, भावावरही हल्ला

व्हिडिओवर १० हजारांहून अधिक कमेंट्स

सिमरन हिचा मॉडेल चायवाली चहाच्या दुकानात चहा बनवतानाचा एक व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गुप्ता गुलाबी रंगाचा टॉप आणि ट्राऊझर परिधान करून ग्राहकांसाठी मसाला चहा बनवत आहे.  पण ती चहा बनवताना वारंवार केसांवरून हात फिरवत असल्याने नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले. इन्स्टाग्रामवर या व्हिडिओवर १० हजारांहून अधिक कमेंट्स आल्या आहेत.

नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रियाअनेकांनी स्वत:चा उदरनिर्वाह आणि ब्रँड तयार केल्याबद्दल तरुण उद्योजकाचे कौतुक केले. तर काहींनी केस उघडे ठेवल्याबद्दल आणि हातमोजे शिवाय खाद्यपदार्थांना स्पर्श केल्याबद्दल तिच्यावर टीका केली. एका युजरने असे म्हटले आहे की, मला केस उघडे ठेवलेले आणि हाजमोजे न घालताच जेवण किंवा इतर काहीही पदार्थ बनवणाऱ्या लोकांचा प्रॉब्लेम आहे. चायसोबत केस फ्री, असे दुसऱ्या युजरने कमेंटमध्ये लिहिले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर