Viral News: सोशल मीडियावर कधी- कधी असे व्हिडिओ पाहायला मिळतात, ज्याची आपण कधीच कल्पना केली नसते. असाच व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हालाही तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही, ज्यात खेळण्यांशी खेळण्याच्या वयात लहान मुलगा चक्क गाडी चालवताना दिसतोय. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी संबंधित मुलाचे कौतूक केले आहे. मात्र, काही जणांनी चिंता व्यक्त केली आहे. या वयात कार चालवणे धोकादायक ठरू शकते, असे त्यांचे म्हणणे आहे.
व्हिडिओमध्ये एक लहान मूल कार चालवताना दिसत आहे. त्याचवेळी त्या मुलाच्या शेजारी बसलेला दुसरा मुलगा या घटनेचा व्हिडिओ बनवत आहे. एकजण मागच्या सीटवर बसून कार चालवण्याचा आनंद घेत आहे. ही तिन्ही मुले इतकी लहान आहेत, त्यांच्या वयाची बेरीज केली तरी १८ होणार नाही.गाडी चालवणाऱ्या मुलाला त्याच्या पायाने गाडीच्या एक्सलेटर आणि ब्रेकपर्यंत पोहोचता येत नाही, म्हणून तो सीटच्या काठावर बसून गाडी चालवत आहे.
या व्हिडीओमधली सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, तिन्ही मुले बिनधास्तपणे गाडी चालवण्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही भीतीचे भाव दिसत नाहीत. गाडी चालवणारी मुल ड्रायव्हिंग करण्यात निष्णात आहेत. गाडी चालवताना एकही चूक त्यांच्या जीवावर बेतू शकते. धक्कादायक बाब म्हणझे, या मुलांना त्यांच्या कुटुंबीयांनी गाडी चालवण्याची परवानगी कशी दिली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
@comedyinmemes या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओला आतापर्यंत जवळपास ५० लाख लोकांनी पाहिला आहे. तर, पाच लाख लोकांनी या व्हिडिओला लाइक केले आहे. त्याचबरोबर अनेक लोक व्हिडिओवर कमेंट करत मुलांच्या या खोडसाळपणावर आश्चर्य व्यक्त करत आहेत. कमेंट करताना एका युजरने लिहिले आहे की, 'आजीच्या घरी आलेला मुलगा आपल्या मामाच्या मुलासोबत खूप मजा करत आहे. यासोबतच काकूंच्या मुलालाही गाडीच्या मागच्या सीटवर बसवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.' दुसऱ्याने लिहिले आहे की, 'या तिघांच्या वयाची बेरीज केली तरी १८ होणार नाही.' तिसऱ्याने लिहिले की, 'कार चालवणाऱ्या मुलाला समोर काही दिसत नाही, वर-खाली दिसत आहे, तरीही तो गाडी चालवत आहे.' चौथ्याने लिहिले आहे की, 'भाऊ, तू आजीच्या घरी गेला होतास, परंतु, परत असे केले तर, पुन्हा आजीच्या घरी जाता येणार नाही.'