Luxury Cars Viral Video: झोमॅटो आणि ब्लिंकिटच्या गुडगाव मुख्यालयाबाहेर उभ्या असलेल्या अलिशान कारचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत अॅस्टन मार्टिन, लॅम्बोर्गिनी, पोर्शेसह अनेक महागड्या गाड्या दिसत आहे. या सर्व गाड्या झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांच्या आहेत, अशी माहिती समोर येत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येते आहेत.
दीपिंदर गोयल गेल्या वर्षी भारतातील पहिली एस्टन मार्टिन डीबी १२ स्पोर्ट्स कारचे मालक बनले होते. दीपिंदर यांनी अॅस्टन मार्टिन रेसिंग ग्रीन रंगात ४.५ कोटी रुपयांची कार खरेदी केली. झोमॅटोच्या गुडगाव येथील कार्यालयाबाहेर अॅस्टन मार्टिनसह पोर्शे ९११ टर्बो एस, लॅम्बोर्गिनी उरस आणि फेरारी रोमा या कारदेखील उभ्या होत्या.
झोमॅटोच्या गुडगाव कार्यालयाबाहेर गोयल यांची एकमेव लक्झरी कार अॅस्टन मार्टिनसह त्यांची पोर्शे ९११ टर्बो एस, लॅम्बोर्गिनी उरस आणि फेरारी रोमा ही कारही तिथे उभी होती. या व्हिडिओमध्ये ब्लिंकिटचे सीईओ अल्बिंदर ढींडसा यांची एक ऑडी, एक मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यू झेड ४ एम ४० आय दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर अवघ्या काही तासांत १० लाखांहून अधिक लोकांनी पाहिला.
या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. 'गोयल यांनी सहा रुपये प्लॅटफॉर्म फी लागू करून अलिशान कार खरेदी केल्या', असे एकाने म्हटले आहेत. दुसऱ्याने म्हटले आहे की, ‘कोणीच कल्पना करू शकत नाही की, अवघ्या सहा रुपयांत माणूस काय करू शकतो, त्याचे एकमेव उदाहरण.’ एका युजरने ‘माझ्या ६ रुपयांत अलिशान कार विकत घेतली.' एका युजरने गंमतीने विचारले की, 'झॉमॅटोच्या ऑर्डर बाईक ऐवजी अशा अलिशान कारने का केली जात नाही?’