मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: लग्नात वधूनं चक्क वराच्या भांगेत भरलं कुंकू; व्हिडिओ पाहून नेटकरी भडकले, म्हणाले...

Viral Video: लग्नात वधूनं चक्क वराच्या भांगेत भरलं कुंकू; व्हिडिओ पाहून नेटकरी भडकले, म्हणाले...

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 13, 2024 02:54 PM IST

Wedding Viral Video: लग्नात वधूने वराच्या भांगेत कुंकू भरल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Married
Married

Viral Video: लग्न समारंभात वर वधूच्या भांगेत कुंकू भरतो आणि मंगळसूत्र घालतो. पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या लग्नातील व्हिडिओमध्ये काही वेगळेच पाहायला मिळाले, ज्यात वधू चक्क वराच्या भांगेत कुंकू भरताना दिसत आहे. काहींना असे करणे योग्य वाटते. तर, काही जण याला कडाडून विरोध करत आहेत.

आपल्या जोडीदारावर प्रेम व्यक्त करण्यासाठी लोक आता नवनवीन गोष्टींचा अवलंब करत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वर प्रथम आपल्या वधूच्या भांगेत कुंकू लावतो. यानंतर वर वधूला त्याच्या मांगेत कुंकू भरण्यास सांगतो. सुरुवातीला वधू हसते आणि नकार देऊ लागते. त्यानंतर वराच्या भांगेत कुंकू भरते. त्याची स्टोरी इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, हे जोडपे पहिल्यांदा जिममध्ये भेटले होते. कुश राठोड असे वराचे नाव आहे. तर, वधूचे नाव कासक गुप्ता आहे.

कुश म्हणाला की कसाक ही त्याची सिनिअर होती. २०१३ मध्ये त्याने पहिल्यांदा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोघांत ओळख झाली आणि ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर दोघांनी एकमेकांशी लग्न केले. मात्र, आता लोक त्याच्या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले आहे की,'भाऊ, तुम्ही तिच्यासाठी लेहेंगा घालायला हवा होता, प्रथा बदलू नका! दुसऱ्या यूजरने लिहिले की,'मी पाहिलेली ही सर्वोत्तम रील आहे. संपूर्ण कुटुंबासमोर हे करण्यासाठी धैर्य लागते. तिसरा वापरकर्ता म्हणाला की, 'मग तू मंगळसूत्रही घालायला हवे होते. तर, चौथा वापरकर्ता म्हणतो, 'ग्रीन प्लॅग आपल्या त्याच्या जागी, प्रथा त्याच्या जागी.'

IPL_Entry_Point

विभाग