Viral Video: रील बनवण्यासाठी दारुड्यानं थेट रेल्वे ट्रॅकवर नेली कार, तितक्यात पाठीमागून आली मालगाडी आणि...
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: रील बनवण्यासाठी दारुड्यानं थेट रेल्वे ट्रॅकवर नेली कार, तितक्यात पाठीमागून आली मालगाडी आणि...

Viral Video: रील बनवण्यासाठी दारुड्यानं थेट रेल्वे ट्रॅकवर नेली कार, तितक्यात पाठीमागून आली मालगाडी आणि...

Nov 12, 2024 09:00 PM IST

Drunk man drives Mahindra Thar on railway track: दारूच्या नशेत एका व्यक्तीने आपली कार थेट रेल्वे रुळावर नेली आणि तितक्यात पाठीमागून एक मालगाडी आली. त्यानंतर पुढे काय घडले, तुम्हीच पाहा.

रील बनवण्यासाठी दारुड्यानं थेट रेल्वे ट्रॅकवर नेली कार
रील बनवण्यासाठी दारुड्यानं थेट रेल्वे ट्रॅकवर नेली कार

Viral News: दारूच्या नशेत एसयूव्ही कार रेल्वे रुळावर नेल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली. घटनेच्या दिवशी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आरोपीने रील बनवण्यासाठी आपली महिंद्रा थार रेल्वे रुळावर नेली. मात्र, थोड्याच वेळात त्याच्या पाठीमागून मालगाडी आली. सुदैवाने, लोको पायलटने वेळीच ब्रेक लगावल्यामुळे मोठी दुर्घटना टळली असून या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. ही घटना राजस्थानच्या जयपूरमध्ये सोमवारी घडली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका व्यक्तीला त्याची कार महिंद्रा थार रेल्वे ट्रॅकवर चालवल्याबद्दल अटक करण्यात आली. संबंधित व्यक्ती दारूच्या नशेत होता आणि रील शूट करण्यासाठी त्याने आपली एसयूव्ही रेल्वे रुळावर नेली. मात्र, काही वेळातच त्याच्या पाठीमागून एक मालगाडी आली. यानंतर आरोपीने कार बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो अपयशी ठरला. मात्र, रेल्वे रुळावर कार अडकल्याचे पाहून लोको पायलटने वेळीच ब्रेक लगावला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओत दिसत आहे की, पोलीस अधिकाऱ्यांसह काही लोक रेल्वे रुळावरून कार काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. अनेकदा प्रयत्न केल्यानंतर कार रुळातून बाहेर निघाली. यानंतर लगेच आरोपीने तिथून धूम ठोकली. पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना आरोपीने तीन जणांना धडक दिल्याची सांगितले जात आहे. या घटनेची माहिती स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी कारचा पाठलाग करून त्याला अटक केली. तसेच त्याची कारही जप्त करण्यात आली.

रील बनवताना रेल्वेने धडकलं, तिघांचा मृत्यू

रील बनवण्यासाठी असा जीवघेणा स्टंट करण्याची ही पहिलीच घटना नाही. अनेकदा अशी कृत्ये करताना लोक गंभीर जखमी झाले आहेत. तर, अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना ट्रेनच्या धडकेने देशभरात अनेकांचा मृत्यू झाला आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये उत्तर प्रदेशातील लखीमपुट खेरी येथे पॅसेंजर ट्रेनच्या धडकेने एक माणूस आणि त्याची पत्नी आणि तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. हे कुटुंब रेल्वे रुळांवर रिल्ससाठी व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना हा अपघात घडला.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर