उपराष्ट्रपती जगदीप धनखडयांची संसद परिसरात मिमिक्री करत त्यांची खिल्ली उडवण्याच्या घटनेवरून आता राजकीय वातावरण तापलं आहे. पंतप्रधान मोदींपासून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या घटनेचा निषेध केला आहे. मिमिक्री करणारे टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेवरून कल्याण बॅनर्जी यांनीमाफी मागण्यास नकार देत म्हटले आहे की, मिमिक्रीही एक कला आहे. धनखड यांनी हे स्वत:वर का घेतले माहीत नाही. पंतप्रधान मोदींनी स्वत: २०१४ ते २०१९ दरम्यान अनेक सभांमध्ये अशाप्रकारचे कृत्य केले आहे.
राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्या मिमिक्रीवरून राजकीय वातावरण तापलं आहे. मंगळवारी दुपारी घडलेल्या या घटनेवरून राजकीय वाद सुरू झाला आहे. लोकसभेतून निलंबित करण्यात आलेले खासदार संसद परिसरात विरोध प्रदर्शन करत होते. यावेळी टीएमसी खासदार कल्याण बनर्जी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची मिमिक्री सुरू केली. या मिमिक्रीचा व्हिडिओ राहुल गांधी यांनी आपल्या मोबाईलमध्ये शुट केला आहे.
टीएमसी खासदाराची मिमिक्री सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. या घटनेची भाजपने टीका केली आहे. यावर पंतप्रधान मोदींनी धनखड यांना फोन करून म्हटले की, ते स्वत: गेल्या २० वर्षापासून अशा प्रकारचा अपमान सहन करत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे.
वाद होताना पाहून टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले की, मिमिक्री एक कला आहे, ती मी दाखवली. माहिती नाही की, धनखड साहेबांनी स्वत:वर ओढून घेतले. जर असे असेल तर राज्यसभेत धनखड यांचे वर्तन असे असते का? धनखड माझे वरिष्ठ आहे. आम्ही दोघे एकाच पेशाचे राहिलो आहोत. आम्हाला माहिती आहे की, कोणाची खिल्ली उडवायची व कोणाची नाही. कल्याण बनर्जी यांनी म्हटले की, असे पहिल्यांदाच झाले नाही. मोदींनीही अशी कृती अनेकदा केली आहे.
संबंधित बातम्या