Vatican city army : जगातील सर्वात लहान देश असलेला व्हॅटिकन सिटी आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशासाठी ओळखला जातो. सेंट पीटर्स बॅसिलिका, सिस्टीन चॅपल आणि व्हॅटिकन म्युझियम सारख्या ऐतिहासिक वास्तूंसाठी हे ठिकाण जगप्रसिद्ध आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, की या छोट्याशा देशाची सुरक्षा एक खास लष्करी टीम हाताळते, ज्याला स्विस गार्ड म्हणतात. विशेष म्हणजे हे लष्करी पथक कोणतीही लढाई लढत नाहीत, असे असूनही या दलातील सैनिकांचे पगार लाखोंमध्ये आहेत.
स्विस गार्ड हे व्हॅटिकन सिटीचे लष्करी दल आहे, ज्याची स्थापना विशेषत: पोपच्या संरक्षणासाठी करण्यात आली होती. ही तुकडी केवळ १५० सैनिकांची असली तरी त्यांची निष्ठा आणि समर्पण अतुलनीय आहे. पोपच्या रक्षणासाठी हे सैनिक आपल्या प्राणांची आहुती देण्याची शपथ घेतात. विशेष म्हणजे व्हॅटिकन सिटीचे एकूण क्षेत्रफळ केवळ १०० एकर असून येथे सुमारे ४९६ लोक राहतात. परंतु दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देतात, ज्यामुळे हे जगातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे.
स्विस गार्ड ही जगातील सर्वात जुनी लष्करी तुकडी आहे. या संघात सामील होण्यासाठी १९ ते ३० वयोगटातील, किमान ५ फूट ८ इंच उंचीचे सैनिक निवडले जातात. यामध्ये केवळ पुरुष सैनिकांचा समावेश असणे बंधनकारक आहे. याव्यतिरिक्त, उमेदवार स्वित्झर्लंडचा नागरिक आणि रोमन कॅथलिक असणे आवश्यक पात्रता आहे.
स्विस गार्डच्या जवानांना दरमहा सुमारे १५०० ते ३६०० युरो पगार मिळतो, जो भारतीय चलनात साडेचार लाख रुपयांपर्यंत आहे. वार्षिक वेतन आणि सुविधांसह त्यांची एकूण कमाई सुमारे एक कोटी रुपयांपर्यंत पोहोचते. या सैनिकांना मोफत घरे, करमुक्त खरेदी, मुलांना मोफत शिक्षण आणि ३० दिवसांची वार्षिक रजा अशा सुविधाही मिळतात. याशिवाय अन्य भत्तेही आहेत.
स्विस गार्डला पारंपारिक हॅल्बर्ड शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय त्यांना आधुनिक लहान शस्त्रांचा वापर करायलाही शिकवले जाते. लाल, पिवळा आणि निळ्या रंगाचा रंगीबेरंगी त्य़ांचा युनिफॉर्म आहे. युनिफॉर्म डिझाइन व्हॅटिकनचा इतिहास आणि परंपरा प्रतिबिंबित करतो.
संबंधित बातम्या