बनावट सीबीआय आधिकारी अन् खोटी खोटी सुनावणी! वर्धमान ग्रुपचे मालक एस पी ओसवाल यांची ७ कोटींची फसवणूक-vardhman group chairman sp oswal defrauded of rs 7 cr by scammers posing as cbi officers ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  बनावट सीबीआय आधिकारी अन् खोटी खोटी सुनावणी! वर्धमान ग्रुपचे मालक एस पी ओसवाल यांची ७ कोटींची फसवणूक

बनावट सीबीआय आधिकारी अन् खोटी खोटी सुनावणी! वर्धमान ग्रुपचे मालक एस पी ओसवाल यांची ७ कोटींची फसवणूक

Oct 02, 2024 10:16 AM IST

Vardhman Group Chairman defrauded : वर्धमान ग्रुपचे चेअरमन एस. पी. ओसवाल हे आंतरराज्य सायबर चोरट्यांच्या फसवणुकीला बळी पडले आहेत. दोन चोरट्यांनी सीबीआयअधिकारी म्हणून त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना सात कोटी रुपयांचा गंडा घातला आहे.

बनावट सीबीआय आधिकारी अन् खोटी खोटी सुनावणी! वर्धमान ग्रुपचे मालक एस पी ओसवाल यांची ७ कोटींची फसवणूक
बनावट सीबीआय आधिकारी अन् खोटी खोटी सुनावणी! वर्धमान ग्रुपचे मालक एस पी ओसवाल यांची ७ कोटींची फसवणूक

Vardhman Group Chairman defrauded : वर्धमान ग्रुपचे चेअरमन एस. पी. ओसवाल यांची सायबर चोरट्यांनी फसवणूक करत त्यांना सात कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. सायबर चोरट्यांनी बनावट अटक वॉरंट घेऊन सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून ओसवाल यांच्याशी संपर्क साधला. पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी दोन सायबर चोरट्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकाउडण ५.२५ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.

अतानू चौधरी आणि आनंद कुमार चौधरी (दोघेही रा. गुवाहाटी, आसाम) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. उद्योगपती आणि इतर लोकांची फसवणूक करण्यासाठी सक्रिय असलेल्या ऑनलाइन फसणवुक करणाऱ्या मोठ्या आंतरराज्य टोळीशी हे दोघे संबंधित आहेत. पंजाब पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून यातील अनेक आरोपींची ओळख पटली आहे. अटक करण्यात आलेले दोघे आरोपी ही आसाम आणि पश्चिम बंगाल येथील रहिवासी आहेत.

बनावट अधिकारी आणि बनावट कोर्ट

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून या दोघांनी वर्धमान ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एसपी ओसवाल यांची सात कोटी रुपयांची फसवणूक केली. या बाबत पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली. या टोळीने सर्वोच्च न्यायालयातील बनावट सुनावणी, बनावट अटक वॉरंट आणि डिजिटल अटक करण्याची धमकी देऊन ही फसवणूक केल्याने खळबळ उडाली आहे.

अशी केली फसवणूक

पोलिसांनी सांगितले की, आरोपी यांनी ओसवाल यांना फोन केला. यावेळी आरोपींनी स्वत:ला सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून मलेशियासाठी पाठवण्यात येणारे पार्सल जप्त केल्याचे ओसवाल यांना सांगितले. त्यात ५८ बनावट पासपोर्ट, १६ डेबिट कार्ड आणि इतर आक्षेपार्ह साहित्य असल्याचे खोटे सांगितले. ही सगळी कागदपत्र ओसवाल यांच्या आधार कार्डशी निगडित असल्याने तेच मुख्य संशयित असल्याचे आरोपी यांनी ओसवाल यांना भासवलं. हे प्रकरण उघडकीस आले तर तर त्यांची बदनामी होईल असे आरोपींनी ओसवाल यांना सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने ओसवाल यांना व्हिडिओ कॉल केला. या कॉलदरम्यान या दरम्यान, आरोपी ज्या ठिकाणी बसले होते ती जागा एखाद्या सीबीयेच्या कार्यालयासारखी दिसत होती व त्यांच्या मागे सीबीआयचा लोगो देखील होता.

सुप्रीम कोर्टाचे खोटे अटक वॉरंट

आरोपींनी सुप्रीम कोर्टाचे खोटे अटक वॉरंट देखील तयार करून ओसवाल यांना व्हॉट्सअॅपवर पाठवल्याचे पोलिसांनी सांगितले. यामुळे ओसवाल हे अस्वस्थ झाले. हे प्रकरण सार्वजनिक होऊ नये म्हणून त्यांना डिजिटल पद्धतीने अटक केली जाईल, असे आरोपींनी ओसवाल यांना सांगितले. तसेच ओसवाल यांना जामीन मिळवून देण्यासाठी मुंबईत वकिलाची व्यवस्था करण्याचे आश्वासनही आरोपींनी त्यांना दिले होते. त्या बदल्यात आरोपींनी ओसवाल यांना दोन वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये सात कोटी रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. तर सर्व आरोपातून मुक्त झाल्यानंतर पैसे परत केले जातील, असे आश्वासन आरोपी यांनी ओसवाल यांना दिले. बादनामीच्या भीतीने ओसवाल यांनी ७ कोटी रुपये चोरट्यांना दिले. कंपनीच्या विविध बँक खात्यांमधून ही मोठी रक्कम ट्रान्सफर करण्यात आली. मात्र, ओसवाल यांना संशय आल्याने त्यांनी त्यांच्या मॅनेजरशी या बाबत चर्चा केली. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली.

लुधियानाच्या सायबर क्राईम पोलिस स्टेशनने तपास सुरू केला आणि आसाममधील गुवाहाटी येथून अतनु चौधरी आणि आनंद कुमार चौधरी यांना अटक केली. या दरम्यान त्यांनीच ज्या खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात आले, त्या खात्यांची व्यवस्था केल्याचे निष्पन्न झाले. आरोपींकडून पोलिसांनी सव्वापाच कोटी रुपये जप्त केले. या प्रकरणातील अन्य पाच जण अद्याप फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी या दोघांना अटक केली असून तांच्या कडून ५ कोटी २५ लाख रुपये जप्त केले आहे. ओसवाल यांची फसवणूक करण्यापूर्वी एका स्थानिक उद्योगपतीला आणखी एका टोळीने १.०१ कोटी रुपयांचा याच पद्धतीने गंडा घातल्याचे देखील उघडकीस आले आहे. रजनीश आहुजा असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या कडून १ कोटी १ लाख रुपये उकळले होते. आहुजा यांच्या बँक खात्यात खंडणीची रक्कम ट्रान्सफर झाल्याचा दावा करून अटक वॉरंटची धमकी देऊन ही फसवणूक करण्यात आली.

 

Whats_app_banner
विभाग