Vande Bharat Viral Video: हावडाहून रांचीला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये वेटर आणि प्रवासी यांच्यात झालेल्या भांडणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी विविध प्रकारच्या कमेंट दिल्या आहेत. वेटरने चुकून शाकाहारी प्रवाशाला मांसाहारी जेवण दिल्याने हा गोंदळ झाला. ट्रेनमधील एका वयोवृद्ध प्रवाशाने खाद्यपदार्थाच्या पाकिटावर मांसाहाराची खूण न पाहता ते शाखाहारी समजून खाल्ले. मात्र, काही वेळाने त्याच्या लक्षात आले की त्याने जे खाल्ले ते शाकाहारी अन्न नव्हते. सध्या पावसाळा सुरू असून या महिन्यात काही जण मांसाहारी पदार्थ खात नाही. त्यात हा व्यक्ती शाकाहारी असल्यानं या प्रवाशाला याचा राग आला. त्याने दोनवेळा थेट वेटरच्या कानशीलात लागावली. ही घटना २६ जुलै रोजी घडल्याचे सांगण्यात येत असून या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये, एक वृद्ध प्रवासी वेटरशी भांडतांना दिसत आहे. तर प्रवाशाने वेटरची माफी मागावी असे काही लोक म्हणत असतांना व्हिडिओत दिसत आहे. फूड पॅकेटवरील चिन्हाबाबत एका व्यक्तीने वृद्ध प्रवाशाला विचारले की, 'हे कुठे लिहिले आहे?' तुम्ही त्याला का मारलेस? तुम्ही त्याची माफी मागा. दरम्यान, वेटर या वृद्ध प्रवाशाची माफी मागताना दिसत आहे. घटनास्थळी एक पोलीस देखील तैनात आहे, जो हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करत आहे.
वंदे भारत एक्सप्रेसमधील हा व्हिडिओ व्हायरल झालं आहे. यामध्ये वंदे भारत ट्रेनमधील इतर प्रवासी वृद्ध व्यक्तीला वेटरची माफी मागताना दिसत आहेत. व्हिडिओ शेअर करताना कपिल नावाच्या एका नेटकाऱ्याने लिहिले की, 'एका व्यक्तीला वेटरने चुकून मांसाहारी जेवण दिल्याने त्याने त्या वेटरला कानाखाली मारली. मात्र, बाकीचे प्रवासी वेटरच्या समर्थनार्थ उभे राहिले. एका यूजरने व्हिडिओवर कमेंट केली की, 'लोकांना योग्य गोष्टींसाठी उभे राहिलेले पाहून चांगले वाटले. ही दुर्मिळ घटना आहे. आणखी एका युजरने लिहिले की, 'सामान्य नागरिक गुंडगिरीविरोधात आवाज उठवताना पाहून चांगले वाटले, असे देखील एकाने म्हटले आहे. ही पोस्ट व्हायरल होत आहे.