मंगळवारी भोपाळहून दिल्लीकडे जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचा मोठा अपघात टळला. वेगाने जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या समोर अचानक एक बैल आला. बैलाच्या धडकेने ट्रेन जागेवरच थांबली. हा अपघात ग्वाल्हेरहून मुरैनाकडे जाताना झाला. या अपघातात वंदेभारत ट्रेनच्या इंजिनचे मोठे नुकसान झाले असून समोरच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. तर बैलही गंभीररित्या जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुरैना येथील शिकारपूर रेल्वे फाटकाजवळ ट्रेनच्या समोर अचानक सांड आला. बैलाच्या धडकेत दिल्लीकडे जाणारी वंदेभारत ट्रेन जवळपास १० मिनिटे ट्रॅकवर उभी होती. माहिती मिळताच रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पाहणी केल्यानंतर ट्रेन पुढे रवाना करण्यात आली. या अपघातात इंजिनच्या समोरचा भाग चक्काचूर झाला आहे.
यापूर्वीही झाले आहेत अपघात -
वंदेभारत ट्रेन सुरू झाल्यानंतर म्हशींना धडक दिल्याच्या घटना समोर आल्या होत्या. सर्वात पहिली वंदेभारत एक्सप्रेस (दिल्ली-वाराणसी) आपल्या ट्रायल रन वेळी गायींना धडकली होती. त्यानंतर मुंबई, अहमदाबाद आणि गुजरातच्या अनेक भागात अशा घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी पाटणा -दिल्ली आणि रांची-हावड़ा वंदेभारत एक्सप्रेसही ट्रायल दरम्यान गायींना धडकून नुकसानग्रसत झाल्या होत्या.
वंदेभारत ट्रेनला जनावरे धडकण्याच्या घटना सतत समोर येत आहेत. याबाबत रेल्वे प्रशासनाने सांगितले की, अशा घटना घडत आहेत, कारण ही ट्रेन नव्या डिझाइनची असून जनावरांना आकर्षित करते. रेल्वेने ही ट्रेन सुरू करण्यापूर्वी याच्या मार्गावर दोन्ही बाजुंनी फेंसिंग करण्याचे नियोजन केले होते. मात्र अजूनपर्यंत कोणत्याही मार्गावर पूर्णपणे फेंस करण्यात आलेले नाही.
संबंधित बातम्या