मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Vande Bharat : प्रवाशांना खुशखबर..! मुंबई-दिल्लीसह ‘या’ मार्गांवर धावणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, वाचा सविस्तर

Vande Bharat : प्रवाशांना खुशखबर..! मुंबई-दिल्लीसह ‘या’ मार्गांवर धावणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, वाचा सविस्तर

Jun 22, 2024 07:39 PM IST

Vande bharat sleeper : वंदे भारत ट्रेननंतर रेल्वे प्रशासनाने वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची योजना आखली आहे. सांगितले जात आहे, १५ ऑगस्ट पासून वंदे भारत स्लीपर रेल्वेचे ट्रायल सुरू केले जाईल.

वंदे भारत स्लीपर ट्रेन
वंदे भारत स्लीपर ट्रेन

Vande Bharat Sleeper : वंदे भारत ट्रेनच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. वंदे भारत ट्रेननंतर रेल्वे प्रशासनाने वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची योजना आखली आहे. सांगितले जात आहे, १५ ऑगस्ट पासून वंदे भारत स्लीपर रेल्वेचे ट्रायल सुरू केले जाईल. ट्रायल यशस्वी झाल्यानंतर ही ट्रेन सामान्य प्रवाशांच्या सेवेत लवकरच दाखल होणार आहे. आपल्या एका निवेदनात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली होती की, भारतीय रेल्वे २०२९ पर्यंत वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या जवळपास २५० यूनिट चालवण्याच्या योजनेवर काम करत आहे.

कोणत्या मार्गांवर धावणार वंदे भारत स्लीपर?
रिपोर्ट्सनुसार, दिल्ली-मुंबई, दिल्ली-कोलकाता मार्गावर नव्या वंदे भारत स्लीपर ट्रेन पहिल्या टप्प्यात धावण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. या ट्रेन भविष्यात राजधानी एक्सप्रेसची जागा घेऊ शकतात. वंदे भारत स्लीपर बोगींचे उत्पादन इंटीग्रल कोच फॅक्ट्री, चेन्नईच्या सहकार्याने बंगळुरूमध्ये भारत अर्थ मूवर्स लिमिटेडच्या युनिटमध्ये केले जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

वंदे भारत स्लीपर ट्रेनची स्पीड किती असणार? 
नवीन वंदे भारत स्लीपर ट्रेन कमाल १६० किलोमीटर प्रतितास वेगाने धावण्याची शक्यता आहे. याचे बाहेरील डिझाइन जवळपास वंदे भारत एक्सप्रेस सारखेच असल्याचे सांगितले जात आहे. या ट्रेनला एकूण १६ कोच असतील व प्रवाशांच्या आरामदायक व सुविधापूर्ण प्रवासासाठी ८२३ बर्थ असतील. या ट्रेनमध्ये प्रवाशांना विमान प्रवासाच्या धर्तीवर सुविधा प्रदान केल्या जातील. भोजन आणि पेयजल उपलब्ध करण्यासाठी पँट्रीची व्यवस्था असेल. बाहेरच्या बाजुला एक स्वंयचालित दरवाजा, एक दुर्घंधीरहित शौचालय असेल. या ट्रेनचे कोच पूर्णपणे साउंड प्रुफ असतील. प्रवासाच्या दरम्यान प्रवाशांना चांगल्या झोपेसाठी आरामदायक सुविधा दिली जाईल.

रेल्वेकडून लवकरच वंदे भारत मेट्रो -
रेलवे विभागा द्वारे आसपासच्या शहरांना जोडण्यासाठी वंदे भारत मेट्रो सेवा सुरू केली जाणार आहे. या ट्रेन कानपूर-लखनऊ, दिल्ली-मेरठ, मुंबई-लोणावळा, वाराणसी-प्रयागराज, पुरी-भुवनेश्वर आणि आग्रा-मथुरा दरम्यान संचालित केली जाईल. सांगितले जात आहे की, प्रत्येक कोचमध्ये २५० लोक आरामात बसून प्रवास करू शकतात. रेल्वेकडून लवकरच वंदे भारत मेट्रोचे ट्रायल रन सुरू केले जाईल.

WhatsApp channel
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर