मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : वंदे भारत ट्रेनमधील जेवणात पुन्हा आढळलं झुरळ; प्रवाशानं शेअर केला फोटो, पाहून नेटकरी संतापले

Viral News : वंदे भारत ट्रेनमधील जेवणात पुन्हा आढळलं झुरळ; प्रवाशानं शेअर केला फोटो, पाहून नेटकरी संतापले

Jun 21, 2024 10:35 AM IST

cockroach in Vande Bharat meal: वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये देण्यात आलेल्या जेवणात झुरळ सापडल्याचा आरोप एका प्रवाशाने केला आहे. याशिवाय, त्याने जेवणात आढळलेल्या झुरळाचा फोटो सोशल मीडियावर देखील शेअर केला आहे.

वंदे भारतमध्ये दिले जाणाऱ्या जेवणात झुरळ आढळलं
वंदे भारतमध्ये दिले जाणाऱ्या जेवणात झुरळ आढळलं (X/@ViditVarshney1)

Vande Bharat: वंदे भारत ट्रेनमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून वाढल्या आहेत. एका एक्स युजरने वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना देण्यात येणाऱ्या जेवणात मृत झुरळ सापडल्याचा फोटो शेअर केला आहे. युजरने सांगितले आहे की, १८ जून रोजी भोपाळहून आग्रा येथे गेलेल्या माझे काका आणि मावशीच्या जेवणात झुरळ आढळून आले. संबंधित विक्रेत्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्याने प्रशासनाला केली. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडने युजरच्या पोस्टला प्रतिसाद देत गैरसोयीबद्दल माफी मागितली आहे. तसेच सेवा पुरवठादारांना योग्य दंड ठोठावण्यात आल्याची माहिती दिली.

युजरने आपल्या पोस्टमध्ये म्हटल की"आज १८-०६-२४ रोजी माझे काका आणि मावशी वंदे भारतवर भोपाळहून आग्र्याला जात होते. आयआरसीटीसीकडून त्यांना जेवणात 'झुरळ' मिळाले. कृपया विक्रेत्यावर कडक कारवाई करा आणि पुन्हा असे होणार नाही, याची काळजी घ्या,' असे विदित वार्ष्णेय या एक्स युजरने मृत झुरळासह जेवणाचा फोटो शेअर करताना लिहिले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

 

रेल्वे प्रवाशांसाठी एक्सवरील अधिकृत सपोर्ट हँडल असलेल्या रेल्वेसेवेने वार्ष्णेय यांना आपला "पीएनआर नंबर आणि मोबाइल नंबर" शेअर करण्याची विनंती केली आणि आपल्या मावशी आणि काकांना सहन कराव्या लागलेल्या अनुभवाबद्दल खेद व्यक्त केला.

आयआरसीटीसीकडूने मागीतली माफी

एक्सवरील पोस्टनंतर दोन दिवसांनी आयआरसीटीसीच्या अधिकृत हँडलने उत्तर दिले. त्यांनी लिहिले की, "सर, आम्ही तुमच्या प्रवासाच्या अनुभवाबद्दल माफी मागतो. ही बाब गांभीर्याने घेण्यात आली असून, संबंधित सेवा पुरवठादाराला योग्य तो दंड ठोठावण्यात आला आहे.

नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

"जर लोकांनी फक्त जेवण तयार केलेल्या कॅन्टीनची स्थिती पाहिली तर बहुतेक कधीच ऑर्डर करणार नाहीत. जेव्हा शक्य असेल, तेव्हा मी घरी शिजवलेले जेवण आणणे पसंत करतो," असे नितीश कुमार नावाच्या एक्स युजरने म्हटले आहे. आणखी एक युजर म्हणाला की, "जेव्हा- जेव्हा कोणी तक्रार करते, तेव्हा रेल्वे फक्त तपशील मागते आणि त्यानंतर कोणतीही कारवाई होत नाही. केवळ खाद्यपदार्थांची गुणवत्ताच नाही तर पॅन्ट्रीमध्ये जास्त चार्जिंगही होते. अधिकाऱ्यांना याची चांगली माहिती आहे, पण काही 'अन्य कारणास्तव' कारवाई होत नाही. "मी रेल्वेचं जेवण खात नाही. घरचे जेवण सोबत घेऊन जा,' असे फिरोज अहमद या एक्स युजरने म्हटले आहे. चौथ्या व्यक्तीने लिहिले की, ज्यांनी या लॉटचे उरलेले अन्न खाल्ले त्यांच्यासाठी विचार सुरू आहेत.

WhatsApp channel
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर