Vande Metro: लाखो रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, वंदे मेट्रोबाबत समोर आली मोठी अपडेट-vande bharat metro train latest update indian railways trial run features details here ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Vande Metro: लाखो रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, वंदे मेट्रोबाबत समोर आली मोठी अपडेट

Vande Metro: लाखो रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, वंदे मेट्रोबाबत समोर आली मोठी अपडेट

Aug 03, 2024 07:43 PM IST

Vande bharat metro train : रेल्वे वंदे भारतच्या वंदे मेट्रो आवृत्तीचे लाँचिंग करणार आहे. रेल्वेने वंदे मेट्रोचे चेन्नई बीच ते कटपाडी जंक्शन दरम्यान ट्रायल रनही सुरू केले आहे.

वंदे भारत मेट्रो
वंदे भारत मेट्रो

Vande Bharat Metro Train : भारतीय रेल्वे लवकरच देशातील लाखो-करोडो प्रवाशांना मोठी भेट देणार आहे. रेल्वे वंदे भारतच्या वंदे मेट्रो आवृत्तीचे लाँचिंग करणार आहे. ही रेल्वे कमी अंतरासाठी चालवली जाईल. प्रवाशांना खुशखबर देताना रेल्वेने वंदे मेट्रोचे चेन्नई बीच ते कटपाडी जंक्शन दरम्यान ट्रायल रनही सुरू केले आहे. याची सुरुवात आजपासून (३ ऑगस्ट) झाली आहे. वंदे मेट्रो ट्रेन मेमू ट्रेन्सची जागा घेतली. ट्रायल रनच्या दरम्यान रेल्वे सुरक्षा चीफ कमिश्नर वंदे मेट्रोमध्ये होते.

रिपोर्टनुसार,वंदे मेट्रो काही महिन्याआधी इंटीग्रल कोच फॅक्ट्रीमध्ये तयार करण्यात आली होती. ही ट्रेन संपूर्ण वातानुकुलित असणार आहेत. याची कमाल वेगमर्यादा १३० किलोमीटर प्रति तास असेल. यामध्येही वंदे भारत प्रमाणे दरवाजे आपोआप ओपन होतील. अन्य ट्रेन्सच्या तुलनेत यामध्ये अनेक सुविधा असतील.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी या ट्रेनचे ट्रायल रन चेन्नई बीच ते कटपाडी जंक्शन पर्यंत झाले. वंदे मेट्रो ट्रेन १३० किलोमीटरचे अंतर कापेल. ट्रेन चेन्नई बीच स्टेशनवरून सकाळी साडे नऊ वाजता सुटेल आणि विलिवकम स्टेशनवर काही अधिकारी ट्रेनमध्ये चढतील. दरम्यान अजूनपर्यंत स्पष्ट झाले नाही की, देशातील पहिली वंदे मेट्रो ट्रेन चेन्नई बीच ते कटपाडी स्टेशन दरम्यानच धावणार आहे की, अन्य मार्गावर सुरू होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वंदे मेट्रो ट्रेनमध्ये वंदे भारत ट्रेन सारख्याच सुविधा असतील. यामध्ये फीचर्सही वंदे भारत ट्रेन सारखेच असतील. मात्र यामध्ये पँट्री कार असणार नाही. कमी अंतरासाठी ही ट्रेन चालवली जात आहे. याच्या माध्यमातून एका शहरातून दुसऱ्या शहरापर्यंतसुविधाजनक पद्धतीने प्रवास केला जाऊ शकतो. एका कोचमध्ये जवळपास १०० प्रवासी बसू शकतात. त्याचबरोबर २०० प्रवासी उभे राहून प्रवास करू शकतात.

बेंगळुरू-एर्नाकुलम वंदे भारत एक्सप्रेस सुरू -

एर्नाकुलम-बेंगळुरू वंदे भारत एक्स्प्रेस ३१ जुलैपासून सुरू झाली आहे. बेंगळुरूला आणखी एक वंदे भारत एक्स्प्रेस मिळणार आहे. भारतीय रेल्वेने सुरू केलेली ही केरळसाठी तिसरी वंदे भारत ट्रेन असून आठवड्यातून तीन वेळा धावणार आहे.

एर्नाकुलम-बेंगळुरू वंदे भारत एक्स्प्रेस एर्नाकुलम जंक्शन येथून दुपारी १२.५० वाजता सुटेल आणि रात्री १०.०० वाजता बेंगळुरूला पोहोचेल. परतीच्या टप्प्यात बेंगळुरू केंट येथून पहाटे ५.३० वाजता सुटेल आणि एर्नाकुलम जंक्शनला दुपारी २.२० वाजता पोहोचेल. ही गाडी त्रिशूर, पलक्कड, पोदनूर, तिरुपूर, इरोड आणि सालेम येथे थांबेल.

आयआरसीटीसी (इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) द्वारे व्यवस्थापित या नवीन सेवेचे बुकिंग आता खुले झाले आहे. एसी चेअर कारसाठी १४६५ रुपये आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कारसाठी २९४५ रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे.

 

एर्नाकुलम ते बेंगळुरू बुधवार, शुक्रवार आणि रविवारी आणि बेंगळुरू ते एर्नाकुलम दरम्यान गुरुवार, शनिवार आणि सोमवारी धावणार आहे. बेंगळुरूच्या आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या मल्याळी व्यावसायिकांसाठी याचा विशेष फायदा होईल, अशी अपेक्षा आहे.