Vande Bharat Makes History: जम्मू-काश्मीरच्या जनतेची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. श्री माता वैष्णोदेवी कटरा ते श्रीनगर दरम्यान वंदे भारत ट्रेनची चाचणी आज पूर्ण झाली. या दरम्यान सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही ट्रेन जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावरून गेली. हा चिनाब रेल्वे पूल आहे. याशिवाय, भारतातील पहिला केबल रेल्वे पूल असलेल्या अंजी खड पुलावरूनही ही गाडी गेली. या वंदे भारत ट्रेनची खास रचना काश्मीर खोऱ्यातील थंड हवामानासाठी करण्यात आली आहे.
या ट्रेनच्या ट्रायलचा व्हिडिओ समोर आला आहे. जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावरून वंदे भारत कशी धावत आहे, हे या व्हिडिओत दाखवण्यात आले आहे. या ट्रेनमध्ये अशा अनेक खास गोष्टी आहेत, ज्यामुळे ती वेगळी बनते. देशात धावणाऱ्या इतर वंदे भारत गाड्यांच्या तुलनेत ही गाडी वेगळी तयार करण्यात आली आहे. यात उच्च दर्जाची हीटिंग सिस्टिम देण्यात आली आहे. त्यामुळे पाणी आणि बायो टॉयलेटच्या टाक्या गोठत नाहीत. याशिवाय ट्रेनच्या विंडशील्डवर हीटिंगची ही सुविधा आहे, ज्यामुळे हवामान खूप थंड असतानाही दृश्यमानता टिकून राहते.
कटरा ते श्रीनगर हे १९० किलोमीटरचे अंतर ही गाडी अवघ्या ३ तासांत पार करेल. मात्र ही गाडी नेमकी कधी धावणार हे अद्याप समोर आलेले नाही. त्याचबरोबर स्थानिकांसह पर्यटकांमध्येही या गाडीबाबत प्रचंड उत्साह आहे. ही ट्रेन आल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील पर्यटनालाही मोठी चालना मिळेल, असे लोकांचे म्हणणे आहे.
सर्व वंदे भारत गाड्यांप्रमाणे, ट्रेनमध्ये टीव्ही किंवा संगीत प्रणाली सारख्या मनोरंजन प्रणाली बसवल्या जातात. याशिवाय, सुरक्षाबाबत लक्षात घेऊन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. बायो-व्हॅक्यूम टॉयलेटमध्ये, म्हणजेच ट्रेनमध्ये विमानांसारखी शौचालये असतात, ती कमी पाण्याचा वापर करतात. तिकिटाची किंमत अद्याप जाहीर केलेली नाही. परंतु, असा अंदाज आहे की, एसी चेअर कारचे भाडे १ हजार ५००- १ हजार ६०० रुपये आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे भाडे २ हजार २००- २ हजार ५०० रुपये असू शकते.
संबंधित बातम्या