Vande bharat pulled by goods train engine : वाराणसीला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचे इंजिन सोमवारी सकाळी निकामी झाल्याने तीन तास ट्रॅकवर मोठा अडथळा निर्माण झाला. नवी दिल्लीहून वारानसीला जात असलेली वंदे भारत एक्सप्रेस आज सुबह इटावाच्या भरथना रेल्वे स्टेशनजवळ बंद पडली. यामुळे ७५० प्रवाशी अडकून पडले. घटनास्थली दाखल झालेल्या इंजिनिअरच्या पथकाने तांत्रिक अडचण दूर करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही.
त्यानंतर वंदे भारत ट्रेनला एका मालगाडीच्या इंजिनने ओढत आणून भरथना रेल्वे स्टेशनवर उभी करण्यात आले. यावेळी भरथना रेल्वेवे स्टेशनवर प्रवाशांनी मोठा गोंधळ घातला. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने शताब्दी एक्सप्रेस आणि अयोध्येला जात असलेली वंदे भारत एक्सप्रेस थांबवून सर्व ७५० प्रवाशांना रवाना केले व सर्वांना कानपूरला पोहोचवले.
रेल्वेने सांगितले की, वाराणसी जाणाऱ्या सर्व प्रवाशांना श्रमिक शक्ति एक्सप्रेसने आपल्या गंतव्याकडे पोहोचवले जाईल. प्रयागराज रेल्वे मंडलचे प्रो. अमित कुमार सिंह यांनी फोनवर माहिती दिली की, बनारस वंदे भारत एक्सप्रेसमध्ये ७५० प्रवासी होते. सर्वांना शताब्दी आणि अयोध्या वंदे भारत ट्रेनने कानपूर व त्यानंतर श्रम शक्ति एक्सप्रेसने बनारसला नेले जाईल.
मिळालेल्या माहितीनुसार, नवी दिल्लीहून वाराणसीला जाणारी ट्रेन क्रमांक २२४३६ सकाळी ८ वाजून ५० मिनिटांनी इटावा रेल्वे स्थानकातून गेली.भरथना ओलांडल्यानंतर काही वेळातच इंजिन निकामी झाल्याने गाडी मुख्य ट्रॅकवर थांबली. यामुळे या मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली. शताब्दी आणि नीलांचल एक्स्प्रेससह अन्य ट्रेन थांबवून ठेवण्यात आल्या.
मुख्य रुळावरून वंदे भारत हटवून भरतना स्थानकातील लूप लाईनवर पुन्हा बसवण्यासाठी सराय भूपत स्थानकातून मालगाडीचे इंजिन रवाना करण्यात आले. यामुळे दुपारी १२.१० वाजेपर्यंत मुख्य मार्ग खुला होऊ शकला. वंदे भारत ट्रेनचे इंजिन बंद पडल्याने प्रवाशांनी भरतना स्थानक अधीक्षक कार्यालयावर निदर्शने केली.
या घटनेचा व्हिडिओ ट्विट करत विरोधकांकडून मोदी सरकारला लक्ष्य केलं जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही व्हिडिओ ट्विट करुन मोदी सरकारला चिमटा काढला आहे. फॅन्सी "वंदे भारत" निकामी झाल्यानंतर काँग्रेसच्या काळातील चांगले इंजिन बचावासाठी येते! असे आव्हाड यांनी म्हटले आहे.