रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये मिळणार फक्त शाकाहारी जेवण, मांसाहारी पदार्थावर बंदी
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये मिळणार फक्त शाकाहारी जेवण, मांसाहारी पदार्थावर बंदी

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये मिळणार फक्त शाकाहारी जेवण, मांसाहारी पदार्थावर बंदी

Feb 02, 2025 03:04 PM IST

Vegetarian Food in Vande Bharat Express : जम्मू-काश्मीरच्या कटरा जिल्ह्यातील श्री माता वैष्णोदेवी हे तीर्थक्षेत्र हे पवित्र स्थळ मानले जाते. त्यामुळे नवी दिल्ली ते कटरा दरम्यान, धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना शाकाहारी जेवण देण्याचा निर्णय घेण्यात आला.

रेल्वे  प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये मिळणार फक्त शाकाहारी जेवण, मांसाहारी पदार्थावर बंदी
रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये मिळणार फक्त शाकाहारी जेवण, मांसाहारी पदार्थावर बंदी

Vegetarian Food in Vande Bharat Express : रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्हाला आता या रेल्वेने प्रवास करतांना तुम्हाला जेवणाची चिंता करावी लागणार नाही.  नवी दिल्लीहून कटरा येथील श्री माता वैष्णोदेवीकडे जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये फक्त शाकाहारी जेवण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रेल्वेच्या कॅन्टीनमध्ये शाकाहारी व  मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे पदार्थ तयार करण्यात येत होती. त्यामुळे अनेकांनी जेवणाच्या दर्जावर शंका उपस्थित केली होती. पण आता काळजी करण्याची गरज नाही. नवी दिल्ली-कटरा वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये आता  १०० टक्के शाकाहारी जेवण मिळणार आहे. 

मांसाहारी पदार्थ रेल्वेतून नेण्यास मनाई 

जम्मू-काश्मीरच्या कटरा जिल्ह्यातील श्री माता वैष्णोदेवी चे तीर्थक्षेत्र हे पवित्र स्थळ मानले जाते. त्यामुळे नवी दिल्ली ते कटरा यांना जोडणाऱ्या वंदे भारत  सेमी हायस्पीड ट्रेनमध्ये प्रवाशांना शाकाहारी जेवण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रवासादरम्यान प्रवाशांना फक्त शाकाहारी खाद्य पदार्थ वितरित केले जाणार आहे.  यासाठी प्रवाशांना ट्रेनमध्ये मांसाहारी पदार्थ किंवा नाश्ता घेऊन जाण्याची देखील परवानगी नाही. त्यामुळे ज्यांना मांसाहारी पदार्थ खायला आवडतात त्यांना असे पदार्थ या गाडीत घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. नागरिकांनी जागरूक राहून या नियमांचे  पालन करावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.  

प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू असताना ही बातमी समोर आली आहे. बाबा जय गुरुदेवांच्या कार्यकर्त्यांनी शाकाहारी फेरी काढली होती. या काळात येथील मांसाहारी दुकाने बंद ठेवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. राज्य सरकारच्या निवेदनानुसार, प्रयागराज कुंभमेळा परिसर हा सामाजिक संदेशांच्या प्रचार आणि प्रसारासाठी एक उत्तम माध्यम सिद्ध होत आहे. बाबा जय गुरुदेवांच्या अनुयायांनी महाकुंभ नगर परिसरात शाकाहारी फेरी काढली. या फेरीमध्ये संगतप्रेमींनी 'बाबा जी शाकाहारी' अशा घोषणा दिल्या. यावेळी भाविकांना शाकाहार हा सर्वोत्तम आहार असून त्याचे फायदे देखील सांगितले.  

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर