Vande bharat train: वंदे भारत एक्सप्रेसमध्‍ये प्रवाशाच्या जेवणात आढळले झुरळ; फोटो व्हायरल
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Vande bharat train: वंदे भारत एक्सप्रेसमध्‍ये प्रवाशाच्या जेवणात आढळले झुरळ; फोटो व्हायरल

Vande bharat train: वंदे भारत एक्सप्रेसमध्‍ये प्रवाशाच्या जेवणात आढळले झुरळ; फोटो व्हायरल

Jul 26, 2023 06:10 PM IST

Cockroach Found In Vande Bharat Meal: वंदे भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या जेवणात झुरळ आढळले आहे.

Vande Bharat Express
Vande Bharat Express

Cockroach Found In Vande Bharat Food: देशात लोकप्रिय होत असलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये एक धक्कादायक घटना घडली. जहाँ राणी कमलापती- हजर निजामुद्दीन वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला आयआरसीटीसीद्वारे दिल्या जणाऱ्या जेवणात झुरळ आढळले. यावर संतापलेल्या प्रवाशाने जेवणाचे फोटो काढून ट्विटरवर शेअर केले. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून अनेकजण रेल्वेकडून दिल्या जणाऱ्या खाद्यपदार्थांबाबत प्रश्न उपस्थित करताना दिसत आहे.

प्रवाशाच्या ट्विटनंतर आयआरसीटीसीने दिलगिरी व्यक्त केली. हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले जाईल, असे अश्वासन त्यांनी दिले. तसेच प्रवाशांना जेवण पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना जेवण बनवताना आवश्यक सावधगिरी बाळगण्याची सक्त ताकीद देण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. याप्रकरणी सेवा प्रदात्याकडून मोठा दंड आकरण्यात आला आहे. भविष्यात अशाप्रकारच्या घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन अधिक काळजी घेईल, असेही आयआरसीटीसीने अश्वासन दिले आहे.

भोपाळच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकाने देखील प्रवाशाच्या ट्विटवर आपली प्रतिक्रिया दिली. प्रवाशासाठी त्वरीत पर्यायी जेवणाची व्यवस्था करण्यात आली. तसेच सेवा प्रदात्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. महत्त्वाचे म्हणजे, याच ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत खंत व्यक्त केली आहे. अनेकांनी याबाबत रेल्वे प्रशासनाकडे तक्रारी देखील केल्या आहेत.

देशभरातील लोकप्रियता लक्षात घेऊन वंदे भारत ट्रेन वेगवेगळ्या मार्गावर चालवल्या जात आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी वेगाने काम सुरू आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात ७५ वंदे भारत ट्रेन चालवण्याची योजना आखली आहे.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर