मराठी बातम्या  /  Nation And-world  /  Vande Bharat Express Indian Railway Latest News Stonepelting 5 Years Jail

Vande Bharat express : सावधान.. वंदे भारत ट्रेनबाबत असे काम केल्यास होऊ शकतो पाच वर्षांचा तुरुंगवास

Vande Bharat
Vande Bharat
Shrikant Ashok Londhe • HT Marathi
Mar 29, 2023 05:33 PM IST

Vande bharat : अनेक ठिकाणीवंदे भारतएक्सप्रेसवर दगडफेकीच्या घटना समोर आल्या आहेत. याबाबत रेल्वेने आता कठोर पाऊल उचलले आहे.

Vande Bharat Express, Indian Railways: केंद्र सरकारने अनेक राज्यात वंदे भारत ट्रेन सुरू केल्या आहेत. यामुळे न केवळ प्रवाशांच्या वेळेची बचत होत आहे, तर अन्य एक्सप्रेसच्या तुलनेत चांगला सुविधाही पुरवण्यात आल्या आहेत. मात्र असे असतानाही अनेक ठिकाणी वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेकीच्या घटना समोर आल्या आहेत. याबाबत रेल्वेने आता कठोर पाऊल उचलले आहे. दक्षिण-मध्य रेल्वे (SCR) ने इशारा दिला आहे की, जर कोणी वंदे भारतसह अन्य एक्सप्रेसवर दगडफेक करताना आढळल्यास त्याला पाच वर्षांचा कारावास होऊ शकतो.

ट्रेंडिंग न्यूज

तेलंगाणा राज्यात वंदे भारत ट्रेनवर झालेल्या दगडफेकीच्या अनेक घटनांनंतर हा इशारा देण्यात आला आहे. एससीआरकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दगडफेकीच्या घटना काजीपेट, खम्मम, काजीपेट-भोंगीर आणि येलुरु-राजमुंदरी येथे झाल्या आहेत. काही दिवसांपासून समाजकंठक वंदे भारत ट्रेनला निशाणा बनवत आहेत. आतापर्यंत दगडफेकीच्या ९ घटना समोर आल्या आहेत. फेब्रुवारी २०१९ मध्ये या ट्रेनच्या उद्घाटनानंतर तेलंगाना,बिहार,उत्तर प्रदेश, छत्तीसगड आदि राज्यात वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक झाली आहे.

एससीआरने म्हटले की, रेल्वेवर दगडफेक करणे क्रिमिनल गुन्हा आहे. यातील आरोपींवर रेल्वे अधिनियम कलम १५३ नुसार कठोर कारवाई केली जाईल. दोषींना पाच वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो. रेल्वे सुरक्षा दल (RPF) द्वारे अनेक गुन्हे नोंद केल्यानंतर आतापर्यंत ३९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. एससीआरचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सी आर राकेश यांनी'पीटीआय'ला सांगितले की, रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) यावर अनेक उपाय करत आहे. त्यामध्ये जनजागृती अभियान आणि रेल्वे रुळाजवळच्या गावातील सरपंचांसोबत संपर्क साधून त्यांना रेल्वे ग्राम मित्र बनवणे सामील आहे.

 

एससीआरने म्हटले आहे की, दगडफेक होणाऱ्या सर्व संवेदनशील ठिकाणी कर्मचाऱ्यांना तैनात केले आहे. यापूर्वी राजधानी आणि शताब्दी एक्सप्रेसवर अनेक वेळी दगडफेकीच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून वंदे भारतला निशाणा बनवला जात आहे. ११ मार्च रोजी हावड़ा-न्यू जलपाईगुड़ी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनवर दगडफेक झाली. यामध्ये एका कोचच्या खिड़कीच्या काचा तुटल्या आहेत.

 

WhatsApp channel