मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Vada Pav ranking : मुंबईचा वडापाव जगात भारी! जगातील प्रसिद्ध सँडविचच्या यादीत पटकावला 'हा' क्रमांक

Vada Pav ranking : मुंबईचा वडापाव जगात भारी! जगातील प्रसिद्ध सँडविचच्या यादीत पटकावला 'हा' क्रमांक

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 14, 2024 12:10 PM IST

Vada Pav Ranked 19th Best Sandwich in the world : जगभरातील प्रसिद्ध सँडविचेसची यादी नुकीतीच प्रसिद्ध करण्यात आली असून या यादीत मुंबईच्या वडापावणे १९ वे स्थान मिळवले आहे.

मुंबईचा वडापाव जगात भारी जगातील प्रसिद्ध सँडविचच्या क्रमवारीत मिळवले 'हे' स्थान
मुंबईचा वडापाव जगात भारी जगातील प्रसिद्ध सँडविचच्या क्रमवारीत मिळवले 'हे' स्थान

Vada Pav Ranked 19th Best Sandwich in the world : भारतात विविध प्रकारचे स्ट्रीट फूड आणि फास्ट फूड प्रसिद्ध आहेत. यात समोसा, कचोरी, पाणी पुरी, वडापावचे नाव आघाडीवर असतं. वडापाव म्हटले की मुंबईच्या वडापावचे नाव आघाडीवर असते. वेगाने पळणाऱ्या मुंबईत अनेकांचे पोट हे  वडापावमुळे भरतं असतं. तसेच आपल्या स्वप्नपूर्ती साठी मुंबईत येणाऱ्या अनेकांची पोटं या वडापावमुळे भरतं. मुंबईत पर्यटनासाठी येणारे परदेशी नागरिक देखील आवडीने या वडापाववर ताव मारतांनाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहे. असा हा वडापाव आता जगात भारी ठरला आहे. जगभरातील प्रसिद्ध सँडविचेसच्या यादीत वडापावने १९ वे स्थान पटकावले आहे.

viral news : वहिनीला दिराने दिले असे काही गिफ्ट की मागे लागले पोलिस; संपूर्ण कुटुंबच अडचणीत; वाचा काय आहे प्रकरण

भरातात गरीब व्यक्ति असो वा श्रीमंत व्यक्ति खमंग वडापाव हा सर्वांच्याच आवडीचा पदार्थ आहे. गरम तेलात तळलेला वडापाव प्रामुख्याने लसण्याच्या लाल आणि पुदिन्याच्या हिरव्या चटणी सोबत आणि तळलेल्या मिरची सोबत आवडीने खाल्ला जातो. हा वडापाव आता साता समुद्रापार देखील गेला आहे. परदेशात देखील अनेक भारतीय नागरिक या वडापावचा व्यवसाय करत आहेत. हा मुळे आता हा वडापाव जगात प्रसिद्ध झाला आहे.

'या' प्रजातीचे कुत्रे पाळणे धोकादायक! केंद्र सरकारने दिला राज्यांना बंदी घालण्याचा सल्ला

जगात प्रसिद्ध असलेल्या फूड अँड ट्रॅव्हल गाईड टेस्ट अॅटलासने जगातील प्रसिद्ध ५० सँडविचेसची यादी नुकतीच जाहीर केली आहे. या यादीत भारताच्या वडापावने १९ वे स्थान मिळवले आहे. गेल्या वर्षी या यादीत हा वडपाव १३ व्या स्थानावर होता. या वर्षी या यादीत वडापाव खाली घसरला असला तरी पहिल्या २० मध्ये वडापावने त्याचे स्थान कायम ठेवले आहे.

एक्स्ट्रा सांबर देण्यास नकार दिल्याने बाप लेकाने केली रेस्टॉरंट मालकाची हत्या

टेस्ट ॲटलसने दिलेल्या माहितीनुसार भारतात वडापाव हा अशोक वैद्य यांनी पाहिल्यांदा  तयार केला. हा वडापाव प्रामुख्याने १९६० ते १९७० च्या दशकात मुंबईत रेल्वेस्थानकाजवळ विक्री होण्यास सुरूवात झाली. यानंतर मुंबई आणि नंतर महाराष्ट्र आणि भारतासह संपूर्ण जगभरात वडापाव प्रसिद्ध झाला.

टेस्ट ॲटलसच्या जगप्रसिद्ध सँडविचच्या यादीत व्हिएतनामचा बन्ह मि सँडविचने अव्वल क्रमांक पटकावला आहे. तर तुर्कीच्या टॉम्बिक सँडविचने दूसरा तर लेबनानच्या शोरमा सँडविचने तिसरा क्रमांक पटकावला आहे.

IPL_Entry_Point