Dehradun Gangraped : उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून डेहराडूनला आलेल्या पंजाबमधील एका तरुनिवर आयएसबीटी बसमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना १३ ऑगस्टरोजी पहाटे घडली. पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच आयएसबीटी कॅम्पसमधून काही लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबची रहिवासी असलेली पिडीत मुलगी ही मुरादाबादहून यूपी रोडवेजच्या बसमध्ये पुढील प्रवासाठी बसली होती. ती १३ ऑगस्ट रोजी पहाटे २ वाजता आयएसबीटी डेहराडूनला पोहोचली. प्रवासी उतरल्यावर तरुणी बसमध्ये एकटी असतांना पाच नराधमांनी तिच्यावर बसमध्ये सामूहिक बलात्कार केला. यानंतर आरोपींनी मुलीला बसमधून उतरवले व तिला तेथेच सोडून निघून गेले. बाल कल्याण समितीच्या बचाव पथकाला ही मुलगी वाईट अवस्थेत आढळली.
जेव्हा समितीने मुलीचे समुपदेशन केले तेव्हा तिने तिच्यावर झालेल्या अत्याचार कथन केला. समितीच्या सदस्यांनी शनिवारी रात्री आयएसबीटी पोस्ट गाठून घटनेची माहिती पोलिसांना दिली. एसएसपी अजय सिंह यांनी सांगितले की, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. एसएसपी यांनी घटनास्थळी जात घटनेची माहिती घेतली. त्यांच्या सूचनेवरून सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
शनिवारी पोलिस पथकाने डेहराडून येथील आयएसबीटीमधून कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले. रोख जमा करण्यासाठी ऑपरेटर घटनास्थळी पोहोचू लागले तेव्हा या प्रकरणाची माहिती समोर आली, मात्र तेथे तैनात असलेला एक कर्मचारी बेपत्ता होता. याबाबत माहिती घेतली असता पोलिसांनी ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याचे पुढे आले. यानंतर ड्रायव्हर-कंडक्टर मोठ्या संख्येने आयएसबीटी पोस्टवर पोहोचले. या ठिकाणी पोलिस किशोरवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या तपासात कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी पोलिस चौकीत आणल्याचे आढळून आले. रात्री बारा वाजेपर्यंत ताब्यात घेतलेल्या कर्मचाऱ्याची चौकशी सुरू होती.
काही नागरिकांनी हेल्पलाइन टीमला आयएसबीटी बस स्टॉप जवळ एक मुलगी वाईट अवस्थेत असल्याचे संगितले. यानंतर एक पथक तेथे गेले तेव्हा एक तरुणी तेथे त्यांना आढळली. तिचे कपडे फाटलेले होते. यानंतर या मुलीला चाइल्ड हेल्पलाइन बूथवर नेण्यात आले. तेव्हा मुलगी रडत होती. हेल्पलाइन टीमने मुलीला बालिका निकेतनमध्ये नेले. तिला विश्वासात घेऊन विचारले असता तिने संगितले की, तिच्या आई-वडिलांचे निधन झाले आहे. ती तिच्या बहिणीसोबत राहत होती. पण, भावजय आणि बहिणीने त्याला घराबाहेर हाकलून दिले. यानंतर ती दिल्लीला पोहोचली आणि तेथून मुरादाबादमार्गे दूनला आली.
मुलीने चौकशीदरम्यान सांगितले की, ज्या बसमध्ये तिच्यावर बलात्कार झाला, ती लाल रंगाची होती. दुसऱ्या राज्यातील रोडवेज बसमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला असावा. पण, उत्तराखंडच्या रोडवेज बसमध्ये तिच्यावर बलात्कार झाला असावा, अशी भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा डेहरादून पोलीस गांभीर्याने तपास करत आहेत.
डेहराडून. आयएसबीटीमध्ये बसमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आल्यानंतर येथील पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या बसस्थानका जवळच पटेल नगर कोतवालीची आयएसबीटी चौकी आहे. बसस्थानकात रात्रभर बसेसची व प्रवाशांची सतत वर्दळ असते. अशात पहाटे बसमध्ये तरुणीवर झालेला बलात्कार अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे.
घटनेच्या वेळी आयएसबीटीमध्ये असलेले सुरक्षा कर्मचारी कोठे होते? असा सवाल देखील उपस्थित होऊ लागला आहे. याचाही तपास पोलिस करत आहेत. सामूहिक बलात्काराच्या वेळी मुलीने विरोध केला असता, तर तिचा ओरडण्याचा आवाज कुणाला का नाही आला ? हा प्रश्न देखील पोलीसांपुढे आहे.
डेहराडूनचे एसएसपी अजय सिंह म्हणाले, "किशोर मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार आली आहे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १३ ऑगस्ट रोजी बाल कल्याण समितीच्या निदर्शनास आली होती. हे प्रकरण उघडकीस येताच, तपासासाठी पथके तैनात करण्यात आली असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. या साठी स्थानकात बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत.