हे तर अजबच झालं! ऋषिकेशमध्ये स्कूटी घेऊन पळाला बैल, Video पाहून हसू आवरणार नाही
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  हे तर अजबच झालं! ऋषिकेशमध्ये स्कूटी घेऊन पळाला बैल, Video पाहून हसू आवरणार नाही

हे तर अजबच झालं! ऋषिकेशमध्ये स्कूटी घेऊन पळाला बैल, Video पाहून हसू आवरणार नाही

HT Marathi Desk HT Marathi
Published May 02, 2025 06:42 PM IST

यावेळी माणसाने नव्हे तर बैलाने स्कूटी चोरण्याचे धाडस केले. या बैलाने स्कूटी चोरून पळ काढल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकही आनंद घेत आहेत.

बैल स्कुटी ढकलत नेताना
बैल स्कुटी ढकलत नेताना

निर्जन रस्त्यांवर वाहने चोरीला गेल्याच्या घटना आपण अनेकदा ऐकल्या, पाहिल्या किंवा वाचल्या असतील. तपासानंतर त्यामागे मानवी हात असल्याचे समोर आले आहे. एक माणूस चोराच्या वेशात येऊन कार आणि दुचाकी चोरतो आणि सहसा पळून जातो, पण उत्तराखंडमधील ऋषिकेशचे प्रकरण वेगळे आहे. यावेळी माणसाने नव्हे तर बैलाने स्कूटी चोरण्याचे धाडस केले. या बैलाने स्कूटी चोरून पळ काढल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकही आनंद घेत आहेत.

भूपी पन्वार नावाच्या हँडलने सोशल मीडिया एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यांनी लिहिलं आहे की, माणसं अनेकदा स्कूटी चोरताना दिसली असतील, पण ऋषिकेशमधील स्कूटी चोरीचं प्रकरण काहीसं वेगळं आहे. येथील रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या बैलांनाही दुचाकी स्कूटीची आवड आहे. ३२ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये ऋषिकेशमधील एक रस्ता दाखवण्यात आला आहे. तिथे २-२ लोक जात आहेत, शेजारी एक बैलही उभा आहे. बैलाच्या शेजारीच पांढऱ्या रंगाची स्कूटीही आहे. लोक निघून जाताच बैलाला काय विचार करावा हे सुचत नसल्याने त्याने स्कूटी जोरात ढकलली आणि त्यावर स्वार होऊन पुढे निघाला.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये पुढे असे दिसून आले आहे की, बैलाने स्कूटर आरामात चालवत असताना बाजूच्या खांबाआड नेऊन लपवून ठेवली. त्यानंतर काही सेकंद बैल स्कूटी लपवून तिथेच उभा राहिला. आता हा व्हिडिओ लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. एका युजरने लिहिले की, मी हे पहिल्यांदाच पाहिले आहे. एकाने लिहिले की, बैल स्कूटी चोरत नव्हता, त्याचा दुसरा काही तरी प्लॅन होता. निम्म्याहून अधिक लोकांनी हसणारे इमोजी पाठवून याचा आनंद घेतला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर