मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  अनैतिक संबंधांच्या संशयातून भयानक कृत्य; पत्नी झोपेत असताना तोंडात विजेची तार कोंबली आणि स्वीच ऑन केला!

अनैतिक संबंधांच्या संशयातून भयानक कृत्य; पत्नी झोपेत असताना तोंडात विजेची तार कोंबली आणि स्वीच ऑन केला!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 10, 2024 10:53 AM IST

Uttarakhand Man Kills Wife: उत्तराखंडच्या लंढौरा येथील एका व्यक्तीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या केली.

husband murderd wife
husband murderd wife

Man Kills Wife Opposing His Affair: चारित्र्याच्या संशयावरून एका व्यक्तीने पत्नीच्या तोंडात जिवंत वीजेची तार कोंबली. या घटनेत पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते. पत्नीच्या हत्येनंतर आरोपीने स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. ही घटना उत्तराखंडच्या रुडकी येथील लंढौरा येथील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री मृत महिला तिच्या सहा वर्षाच्या मुलीसोबत खोलीत झोपलेली असताना आरोपीने तिच्या तोंडात जिवंत तार तिच्या तोंडात कोंबली. वीजेच्या धक्क्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. पत्नीच्या हत्येनंतर आरोपीने पोलीस ठाणे गाठून स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले. या हत्येची घटना ऐकून पोलीसही चक्रावून गेले.

या हत्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. चारित्र्याच्या संशयावरून आरोपीने पत्नीची हत्या केल्याची कबूली दिली. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आरोपीच्या मुलाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पत्नीची हत्या करत असताना तिच्या जवळ झोपलेल्या सहा वर्षाच्या मुलीने सर्वप्रकार पाहिला. परंतु, आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. धमकीच्या भितीने मुलगी काहीच बोलली नाही. जेव्हा आरोपीने पोलिसांकडे जाऊन आत्मसमर्पण केले, त्यावेळी कुटुंबातील इतर सदस्यांना हत्येची माहिती मिळाली.

WhatsApp channel

विभाग