पत्नीच्या मृत्युनंतर मुलांना फुलासारखं जपलं; नंतर पैशांसाठी त्यांनीच जन्मदात्या पित्याचा काढला काटा-uttarakhand crime daughter and boy kills father over money dispute ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  पत्नीच्या मृत्युनंतर मुलांना फुलासारखं जपलं; नंतर पैशांसाठी त्यांनीच जन्मदात्या पित्याचा काढला काटा

पत्नीच्या मृत्युनंतर मुलांना फुलासारखं जपलं; नंतर पैशांसाठी त्यांनीच जन्मदात्या पित्याचा काढला काटा

Dec 31, 2023 04:25 PM IST

Uttarakhand Bhagadevali village Murder: उत्तराखंडच्या भागादेवली गावात जन्मदात्या पित्याची हत्या केल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली.

Crime
Crime

uttarakhand Murder: उत्तराखंडच्या अल्मोडा येथील लमगडा परिसरातील भागादेवली गावात जन्मदात्या पित्याची हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. आर्थिक वादातून पित्याची हत्या करण्यात आली, अशी माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

सुंदरलाल असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मृताच्या धाकट्या भाऊ ओम प्रकाश यांनी पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार, सुंदरलाल यांचे मुले लहान असताना त्याची पत्नी गीता देवीचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यावेळी सुंदरलाल नोकरी करत होते. पत्नीच्या मृत्युनंतर सुंदरलालने त्यांच्या मुलांना देहरादूर येथे ठेवले. आयटीबीपीद्वारे मिळालेल्या सीमाद्वार परिसरात मिळालेल्या सरकारी क्वार्टरमध्ये मुलांच्या राहण्याची व्यवस्था केली. मुलांना चांगले शिक्षण दिले. त्यांना कधीच आईची कमतरता जाणवू दिली नाही. नोकरीच्या अंतिम टप्प्यात त्यांची लडाखमध्ये बदली झाली. कित्येक किलोमीटर दूर असूनही सुंदरलाल यांचे लक्ष मुलांकडेच होते. परंतु, आपले मुले आपल्याच जीवावर उठतील, असा त्यांनी कधीच विचार केला नसेल.

पित्याच्या हत्येमागे आर्थिक कारण सांगितले जात आहे. उच्च शिक्षण घेतल्यानंतरही डिंपल आणि हृतिक डेहराडूनमध्ये आपला खर्च भागवू शकत नव्हते, असे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले. ते वारंवार सुंदरलाल यांच्याकडे पैशांची मागणी करत असे. मोठी मुलगी तिच्या खात्यात एकरकमी रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी सुंदरलालवर दबाव टाकत होती.

सुंदरलाल गावी आल्यामुळे त्याच्या धाकट्या मुलीला मोठी बहिण आणि भावांवर अवलंबून राहत होते.यामुळेच लहान बहीणही मोठ्या भावाच्या व बहिणीच्या दबावाखाली आली. पण, तिच्या भावंडांसोबतच तिच्यावरही पित्याच्या हत्येचा आरोप लावला जाईल, याची तिला कल्पना नव्हती.

सुंदरलालने त्यांच्या मुलांना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. सुंदरलालने त्याच्या मुलांच्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या. आपल्या कथित प्रियकरासह आपल्या वडिलांच्या हत्येचा कट रचणारी मोठी मुलगी डिंपलला सुंदर लाल यांनी चांगले उच्च शिक्षण दिले. डिंपल यांनी पीएचडी केली आहे. त्यांच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेला त्यांचा मुलगा हृतिकही एम.कॉम.चे शिक्षण घेतले आहे.

विभाग