मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Uttarakhand Bus Accident : ५० प्रवाशांना घेऊन जाणारी बस ५०० मीटर खोल दरीत कोसळली
५० प्रवाशांना घेऊन जाणारी बस ५०० मीटर खोल दरीत कोसळली
५० प्रवाशांना घेऊन जाणारी बस ५०० मीटर खोल दरीत कोसळली

Uttarakhand Bus Accident : ५० प्रवाशांना घेऊन जाणारी बस ५०० मीटर खोल दरीत कोसळली

05 October 2022, 0:13 ISTShrikant Ashok Londhe

उत्तराखंडमध्ये सायंकाळच्या सुमारास पौडी जिल्ह्यात एक अंगावर काटा आणणारा अपघात (Uttarakhand Bus Accident) घडला आहे. ४५ ते ५० जणांना घेऊन जाणारी एक बस ५०० मीटर खोल दरीत कोसळली आहे.

उत्तराखंडमध्ये हिमस्खलनामुळे १० गिर्यारोहकांचा मृत्यू झाल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळच्या सुमारास पौडी जिल्ह्यात एक अंगावर काटा आणणारा अपघात घडला आहे. ४५ ते ५० जणांना घेऊन जाणारी एक बस ५०० मीटर खोल दरीत (Uttarakhand Bus Accident) कोसळली आहे. आतापर्यंत ६ जणांना जखमी अवस्थेत दरीतून बाहेर काढण्यात आलं आहे. अन्य प्रवाशांचा शोध सुरू आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अंधार पडल्यामुळे मदत व बचावकार्यात अडथळे येत आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले.ही बस ५०० मीटर खोल दरीत कोसळली असून आतापर्यंत ६ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती डीजीपी अशोक कुमार यांनी दिली आहे.

 

‘एएनआय’ वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, बसमध्ये सुमारे ४५ ते ५० जण प्रवास करत होते. दरम्यान,चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.ही घटना उत्तराखंडच्या पौडी गढवाल जिल्ह्यातील सिमडी गावाजवळ घडली आहे. येथील रिखनिखल-बिरोखल रस्त्यावर असणाऱ्या एका दरीत ही बस कोसळली आहे.

 

विभाग