Uttar Pradesh Viral News: उत्तर प्रदेशच्या महाराजगंजमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आपल्या पत्नीने दोन मुलांना जन्म दिला, तेव्हा एका व्यक्तीला खूप आनंद झाला. मात्र, जेव्हा त्याची पत्नी तिसऱ्यांदा गरोदर राहिली, तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला. या व्यक्तीने पत्नीकडे विचारपूस केली असता तिने जे काही सांगितले ते ऐकल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीन सरकली.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण महाराजगंज जिल्ह्यातील पणियारा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील आहे. संबंधित व्यक्ती त्याची पत्नी आणि दोन मुलांसह आनंदाने राहत होते. मात्र, त्याची पत्नी तिसऱ्यांदा गरोदर राहिल्यानंतर त्याला संशय आला. त्याने पत्नीची चौकशी केली असता तिचे त्याच गावातील एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले. एवढेच नाहीतर दोन्ही मुले त्याची नसून प्रियकराची असल्याचे तिने सांगितले.
पत्नीने पुढे सांगितले की, तिचे गावातील एका तरुणासोबत गेल्या ४-५ वर्षांपासून विवाहबाह्य संबंध होते. हे दोघेही लपून-छपून एकमेकांना भेटायचे. याची कोणालाच माहिती नव्हती. मात्र, अशा भेटीतून तिने प्रियकराच्या दोन मुलांना जन्म दिला, ज्यांना तिच्या पतीने आपले समजले होते.
पत्नी तिसऱ्यांदा गर्भवती राहिल्याने पतीला संशय आला. पतीने चौकशी केली असता ही धक्कादायक माहिती समोर आली. पत्नीबाबतचे कटू सत्य समोर आल्यानंतर पतीला धक्काच बसला. पत्नीने तिच्या प्रियकराशी लग्न केल्याचे समजताच त्याला आणखी धक्का बसला. यानंतर पतीने त्याच्या पत्नीला घराबाहेर काढले. यानंतर ती प्रियकराच्या घरी पोहोचली. पण प्रियकरानेही तिला घरात ठेवण्यास नकार दिला. मात्र, गावकऱ्यांनी दबाव आणल्याने प्रियकराला नमते घ्यावे लागले.
ओडिशातील ब्रह्मपूरचे पोलीस अधीक्षक श्रावण विवेक एम सध्या चर्चेत आहेत. मारहाण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींचे चेहरे लपवण्यासाठी त्यांनी वेगवेगळे 'इमोजी' वापरले. आता त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. एसपींनी शुक्रवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर आरोपींचे फोटो शेअर केले. चारही आरोपींचे चेहरे वेगवेगळ्या हावभावांसह इमोजींनी लपलेले आहेत. बाप-लेकावर हल्ला करणाऱ्या चौघांना गोपाळपूर पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. सोमवारी सकाळपर्यंत ही पोस्ट १३ लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली होती. त्याच्या या पोस्टवर प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही येत आहेत. गणेश रेड्डी (वय,३४) आणि त्याचे वडील के. कालू रेड्डी यांच्यावर ४ नोव्हेंबर रोजी हल्ला करण्यात आला होता. या आरोपाखाली चार जणांना अटक करण्यात आली आहे.