Women Kills Husband In Uttar Pradesh: उत्तर प्रदेशच्या फतेहपूर येथून धक्कादायक घटना उघडकीस आली. नणंदच्या लग्नावरून झालेल्या वादातून एका महिलेने पतीची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या भावासह एकूण पाच जणांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नणंदच्या लग्नात एलईडी टीव्ही आणि सोन्याची अंगठी देण्यावरून पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. याच भांडणातून आरोपी महिलेची हत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्र प्रकाश असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. चंद्र प्रकाशच्या बहिणीचे लग्न ठरले आहे. लग्नात बहिणीला एलईडी टीव्ही आणि सोन्याची अंगठी भेट म्हणून देण्याचे चंद्र प्रकाश ठरवले. मात्र, प्रकाशच्या पत्नी श्रमा मिश्राने नकार दिला. यामुळे दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. हे भांडण मिटण्यासाठी क्षमाने भावासह इतर नातेवाईकांना बोलावून घेतले. मात्र, वाद मिटण्याऐवजी आणखी पेटला आणि क्षमाच्या नातेवाईकांनी चंद्र प्रकाशला मारहाण केली.
फतेहपूरचे पोलिस सर्कल ऑफिसर डॉ. बिनू सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्र प्रकाशला मारहाण झाल्याची माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी प्रकाशला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. मात्र, चंद्र प्रकाशला काठीने मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुख्य आरोपी क्षमा मिश्रा आणि तिच्या भावासह पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणातील आरोपींची चौकशी केली जात असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी ३४ वर्षांपासून फरार असलेल्या ६१ वर्षीय हत्येच्या आरोपीला सोमवारी सायंकाळी अटक केली. आरोपी जहांगीर शेख हा १९९० मध्ये एका व्यक्तीची हत्या करून त्याचा मृतदेह मुंबई-अहमदाबाद महामार्गावर फेकून दिला होता. डिसेंबर १९९० मध्ये अंधेरीतील मरोळ येथील रहिवासी रेनॉल्ड ख्रिश्चन आमन्ना यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हे शाखेने तक्रारदाराचा २२ वर्षीय भाऊ गॅब्रिएल ऊर्फ सुधाकर अमन्ना याच्या हत्येप्रकरणी पाच जणांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ आणि १२० (ब) अन्वये गुन्हा दाखल केला.
जहांगीर, संजय, संतोष, पास्कल आणि किशोर हे पाचजण मीरारोडयेथील काशिमीरा येथे एका पार्टीत सहभागी झाले होते, त्यानंतर त्याचा भाऊ घरी परतलाच नाही, असे रेनॉल्डने पोलिसांना सांगितले होते. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, तक्रारदाराला आरोपींबद्दल किंवा हत्येमागील हेतूबद्दल काहीही माहित नव्हते, ज्यामुळे त्यांची ओळख पटविणे पोलिसांसाठी कठीण काम बनले. यातील एक आरोपी जहांगीर हा अंधेरी-कुर्ला रोडयेथे वास्तव्यास असून स्थानिक बेकरीमध्ये कामाला असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी सायंकाळी अधिकाऱ्यांच्या पथकाने जहांगीरला अटक केली. किरकोळ वादातून गॅब्रिएल अमन्ना याची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली.