Uttar Pradesh Viral News: लग्नानंतर पती- पत्नीला एकमेकांच्या चांगला तसेच वाईट सवयींची माहिती होते. काही लोक आपल्या जोडीदाराला न आवडलेल्या सवयी सुधारतात आणि आनंदी राहतात. मात्र, उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. लग्नाच्या अवघ्या ४० दिवसानंतर नवविवाहित दाम्पत्य घटस्फोटाच्या उंबरठ्यावर पोहोचले. पतीच्या वाईट सवयींमुळं महिला खूप नाराज होती. महिलेने त्याला सुधारण्याचा प्रयत्न केला. परंतु, पतीच्या वागण्यात बदल न झाल्याने महिलेने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. नवविवाहित दाम्पत्यामध्ये नेमके काय घडले, हे जाणून घेऊयात.
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेला समजले की, तिचा नवरा रोज आंघोळ करत नाही. तो आठवड्यातून एकदा अंघोळ करतो. त्यामुळे त्याच्या अंगातून दुर्गंधी येत होती. महिलेने अनेकदा त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्याने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. या महिलेने सांगितले की, तिच्या नवऱ्याने ४० दिवसांत फक्त ६ वेळा अंघोळ केली आहे.
महिलेच्या नातेवाईकांनी तिच्या पतीच्या कुटुंबाविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार दाखल करून घटस्फोटाची मागणी केली. संबंधित महिला गेल्या अनेक दिवसांपासून माहेरी राहत आहे. आपली चूक लक्षात आल्यानंतर महिलेच्या पतीने तिची माफी मागितली आणि यापुढे दररोज अंघोळ करेल, असे मान्य केले. नवविवाहित दाम्पत्याचे नाते तुटण्यापासून वाचाचे, यासाठी त्यांचे समुपदेशन केले जात आहे. परंतु, महिला घटस्फोटाच्या निर्णयावर ठाम असल्याचे समजत आहे.
याआधीही अशी एक घटना उघडकीस आली होती. पतीने स्नॅक्स आणायचे बंद केले म्हणून संतापलेल्या महिलेने थेट घटस्फोटाचा निर्णय घेऊन सर्वांना धक्का दिला. महिलेने सांगितले की, तिला मसालेदार पदार्थ खायला आवडतात. मात्र, गेल्या दिवसांपासून पतीचे याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे तिने पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. या महिलेला मसालेदार पदार्थांचे व्यसन असल्याने ती आपल्या पतीला रोज पाच रुपयांचे कुरकुरे आणायला सांगायची. मात्र, एक दिवस पती कुरकुरे न आणताच घरी आला. यावरून वाद पेटला, जो घटस्फोटापर्यंत पोहोचला.