Agra SBI ATM News: उत्तर प्रदेशातील आग्रा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेबाहेर लावलेले एटीएम मशीन चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना घडली. सोमवारी पहाटे २.३० ते ३.०० वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक लोकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी चोरट्यांना पकडण्यासाठी आजूबाजुच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली.
ही घटना कागरौल पोलीस स्टेशन हद्दीतील कागरौल शहरात घडली. शहरातील बसस्थानकाजवळ स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. शाखेच्या बाहेर रस्त्याच्या कडेला एटीएम मशीन बसवण्यात आले आहे. पहाटे पावणेतीन वाजताच्या सुमारास काही चोरटे एटीएममधील पैसे चोरण्यासाठी आले. परंतु, त्यांना एटीएम फोडता न आल्याने त्यांनी चक्क एटीएम मशीनच पळवून नेले. एटीएममध्ये सुमारे ३० लाख रुपये होते. एटीएम फोडण्याचा आवाज ऐकल्यानंतर स्थानिक लोकांना जाग आली. मात्र तोपर्यंत चोरटे फरार झाले. त्यांनी त्वरीत पोलिसांना याबाबत माहिती दिली.
या घटनेची माहिती मिळती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शाखा व्यवस्थापकाने पोलिसांकडे लेखी तक्रार दिली. या प्रकरणातील चोरटे पकडले गेले नाहीत. पोलीस एटीएम मशीनच्या आजूबाजुच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी करत आहेत.
भाग्यलक्ष्मी या मराठी मालिकेतून घराघरांत पोहोचलेली प्रसिद्ध मराठी अभिनेत्री नेहा पेंडसेंच्या घरी चोरी झाली. वांद्रे पश्चिम येथे अरेटो बिल्डिंगमध्ये नेहाचा व तिचा पती शार्दुल सिंह बयास यांचा आलिशान फ्लॅट आहे. या फ्लॅटमधून काही दागिने चोरीला गेले आहेत. यामध्ये लग्नात त्यांना मिळालेले एक सोन्याचे कडे आणि एक हिऱ्यांची अंगठी याचा समावेश आहे. त्यांची किंमत तब्बल सहा लाख आहे.