Viral News: महिला प्राध्यापकाच्या बनावट इंस्टा अकाऊंटवरून घाणेरड्या पोस्ट, विद्यार्थिनीचं धक्कादायक कृत्य!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News: महिला प्राध्यापकाच्या बनावट इंस्टा अकाऊंटवरून घाणेरड्या पोस्ट, विद्यार्थिनीचं धक्कादायक कृत्य!

Viral News: महिला प्राध्यापकाच्या बनावट इंस्टा अकाऊंटवरून घाणेरड्या पोस्ट, विद्यार्थिनीचं धक्कादायक कृत्य!

Dec 25, 2024 11:18 AM IST

UP Female Professor Viral News: महिला प्राध्यापकाने उशीर झाला म्हणून एका विद्यार्थिनीला झापले. मात्र, राग डोक्यात ठेवून विद्यार्थिनीने महिला प्राध्यापकाच्या नावाने बनावट इंस्टा अकाऊंट बनवले आणि घाणेरड्या पोस्ट केल्या.

 महिला प्राध्यापकाच्या बनावट इंस्टा अकाऊंटवरून घाणेरड्या पोस्ट, विद्यार्थिनीचं धक्कादायक कृत्य!
महिला प्राध्यापकाच्या बनावट इंस्टा अकाऊंटवरून घाणेरड्या पोस्ट, विद्यार्थिनीचं धक्कादायक कृत्य!

Viral News: उत्तर प्रदेशातील कानपूर येथील एका महाविद्यालयातील महिला प्राध्यापकाने एनएसएस शिबिरातील एका विद्यार्थिनीने निष्काळजीपणा केल्याची तक्रार तिच्या पालकांकडे केली. मात्र, यामुळे संतापलेल्या विद्यार्थिनीने प्राध्यापकाच्या नावाने बनावट इन्स्टा अकाऊंट बनवून घाणेरड्या पोस्ट केल्या. प्राध्यापकाचे फोटोही एडीट करून शेअर करण्यात आले. याबाबत माहिती मिळताच महिला प्राध्यापकांने स्वरूपनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यात एका विद्यार्थिनीचा हात असल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वरूपनगर येथील एका महाविद्यालयातील प्राध्यापकाने दोन दिवसांपूर्वी आपल्या नावाने बनावट इन्स्टा अकाऊंट तयार करून घाणेरड्या पोस्ट करण्यात आल्याची फिर्याद स्वरूपनगर पोलिसांना दिली. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी ताबडतोब तपासाला सुरूवात केली. याप्रकरणी अधिक तपास केला असता यात एका विद्यार्थिनीचा हात असल्याचे समजले, जी एनएसएसचे प्रशिक्षण घेते.

शिबिरादरम्यान विद्यार्थिनी रात्रभर एका तरुणाशी फोनवर बोलत होती, सकाळी वेळेवर न पोहोचल्याने महिला प्राध्यापकाने विद्यार्थिनीचा मोबाइल तपासला आणि तिच्या पालकांना बोलावून याबाबत माहिती दिली. यावर संतापलेल्या विद्यार्थिनीने तिला धडा शिकवण्यासाठी प्राध्यापकाच्या नावाने बनावट इन्टा अकाऊंट तयार केले आणि घाणेरड्या पोस्ट केल्या. या विद्यार्थिनीने पकडले जाऊ नये म्हणून वर्गमित्राच्या मोबाइल क्रमांकावरून इन्स्टा अकाऊंट तयार केले, अशी माहिती स्वरूपनगर पोलिसांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो टाकून मुलींची बदनामी करण्याच्या घटना घडल्या आहेत. मिशन शक्ती अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या मोहिमेत आलेल्या तक्रारींचे विश्लेषण करून ही वस्तुस्थिती समोर आली आहे. मुली ही आपले वैर व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियावर आपल्या मित्राची किंवा ओळखीची बदनामी करत असतात. त्यांची संख्याही २० टक्क्यांच्या आसपास आहे. इन्स्टाग्राम, फेसबूक आणि इतर सोशल साइट्सवर आक्षेपार्ह फोटो टाकून बदनामीच्या घटना वाढल्या आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर