मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Bird hits Plane विमानाला पक्षाची धडक; वाराणसीत आपत्कालीन लॅंडींग; मोठी दुर्घटना टळली

Bird hits Plane विमानाला पक्षाची धडक; वाराणसीत आपत्कालीन लॅंडींग; मोठी दुर्घटना टळली

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Aug 05, 2022 07:57 PM IST

वाराणसी येथील लाल बहादुर शास्त्री अंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुंबई येथे येणाऱ्या विस्तारा एयरलाइन्सच्या विमानाला एक पक्षी धडकल्याने या विमानाचे आपत्कालीन लॅंडींग करण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

वाराणसी येथील लाल बहादुर शास्त्री अंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुंबई येथे येणाऱ्या विस्तारा एयरलाइन्सच्या विमानाला एक पक्षी धडकल्याने या विमानाचे आपत्कालीन लॅंडींग करण्यात आले.
वाराणसी येथील लाल बहादुर शास्त्री अंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुंबई येथे येणाऱ्या विस्तारा एयरलाइन्सच्या विमानाला एक पक्षी धडकल्याने या विमानाचे आपत्कालीन लॅंडींग करण्यात आले.

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून मुंबईला येणाऱ्या विमानाला पक्षी धडकल्याने खळबळ उडाली. वाराणसी येथील लाल बहादुर शास्त्री अंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेऊन एक विमान हे मुंबईला येत होते. विस्तारा एअरलाईन्सचे हे विमान होते. या विमानाला अचानक एक पक्षी येऊन धडकल्याने याच विमानताळच्या रनवेवर या विमानाचे आपत्कालीन लॅंडींग करावे लागले. या घटमेमुळे विमानतळ प्रशासनाची धावपळ उडाली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. या घटनेमुळे विमानात निर्माण झालेला बिघाड दुरुस्त केला जात आहे.

विस्तारा एअरलाईन्सची UK 622 ही फ्लाइट शुक्रवारी संध्याकाळी ४.१० वाजता उड्डाण करणार होता. उड्डाणा दरम्यानच विमानाच्या पुढच्या भागाला येऊन एक पक्षी येऊन धडकला. वैमानिकाने तात्काळ वाराणसी एटीसीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून विमानाच्या उड्डाणाच्या काही वेळातच आपत्कालीन लॅंडींग केले. या विमानात जवळपास १०१ प्रवासी होते.

विमानाने हवेत भरारी घेताच विमानाला काही तरी धडकल्याचे वैमानिकाला जाणवले. त्याने त्वरित ही बाब एटीसीच्या अधिकाऱ्यांना सांगितली. एटीसीची परवानगी मिळताच वैमानिकाने संध्याकाळी ४.४० च्या सुमारास विमानाचे आपत्कालीन लॅंडींग केले. विमान विमानतळावर सुखरूप उतरल्यावर सर्व प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. तंत्रज्ञ विमानात आलेला बिघाड दरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत.

दोन दिवसांपूर्वी प्रयागराज येथे लष्कराच्या चिता या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लॅंडींग करण्यात आले होते. हे हेलिकॉप्टर रांची पासून प्रयागराज येथे जात होते. उड्डाणानंतर वैमानिकाला हेलीकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याचे कळले.

IPL_Entry_Point

विभाग