Viral Video: जन्मदात्या पित्यानं केलं पोटच्या मुलीशी लग्न, कारण ऐकून गावकऱ्यांना बसला धक्का-uttar pradesh shocking father got married to his own daughter video goes viral ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: जन्मदात्या पित्यानं केलं पोटच्या मुलीशी लग्न, कारण ऐकून गावकऱ्यांना बसला धक्का

Viral Video: जन्मदात्या पित्यानं केलं पोटच्या मुलीशी लग्न, कारण ऐकून गावकऱ्यांना बसला धक्का

Aug 16, 2024 12:11 PM IST

Uttar Pradesh Man Married His daughter: उत्तर प्रदेशमध्ये एका व्यक्तीने स्वत:च्या मुलीसोबत लग्न केल्याची घटना उघडकीस आली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Married
Married

Man Married His daughter In Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील एका गावातून एक अत्यंत लाजिरवाणी बातमी समोर आली आहे, जिथे जन्मदात्या पित्याने चक्क पोटच्या मुलीशी लग्न केले. या आगळ्यावेगळ्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. हे संपूर्ण प्रकरण काय आहे, संबंधित व्यक्तीने स्वत:च्या मुलीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पंकज तिवारी असे त्या व्यक्तीचे नाव आहे. मुलीशी लग्न करण्याशिवाय त्याच्याजवळ दुसरा पर्याय नव्हता असे तो बोलत आहे. आपल्या आयुष्यात दुसरे कोणी नाही, असे सांगून त्याने आपल्या मुलीला दुसरीकडे पाठवण्याऐवजी तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यात संबंधित व्यक्ती आपल्या मुलीसोबत लग्नाचे पारंपारिक विधी पार पाडताना दिसत आहे.या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून समाजातील विविध लोकांनी या लग्नाला तीव्र विरोध दर्शवला आहे. लोक याला कायद्याच्या विरोधात मानत आहेत आणि पंकज तिवारीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. अशा घटनांमधून समाजाची विचारसरणी आणि कमकुवतपणा समोर येतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे. या लग्नानंतर पंकज आणि त्याच्या मुलीविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.स्थानिक प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले असून दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल असे सांगितले आहे.

पित्या-पुत्रीविरोधात कारवाई करण्याची मागणी

पित्याने मुलीसह लग्न केल्याच्या घटनेने समाजासमोर अनेक महत्त्वाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. अशा प्रकरणांकडे दुर्लक्ष करता येईल का? अशा घटनांवर कडक कायदे व्हायला हवेत? ही घटना समाजात नैतिकता आणि कायद्याचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे, याचा विचार करायला भाग पाडते, अशी अनेकांनी प्रतिक्रिया दिली.

विभाग