मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  धक्कादायक..! आश्रमात साधुला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं, महंताच्या गादीवरून सुरू होता वाद

धक्कादायक..! आश्रमात साधुला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं, महंताच्या गादीवरून सुरू होता वाद

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 10, 2024 05:16 PM IST

Monk burnt Alive in Kannauj : उत्तरप्रदेशमधील एका आश्रमातील २० वर्षीय साधु शिवदास उर्फ शिवम यांना जिवंत जाळण्याचा प्रकार समोर आला आहे. या आश्रमात महंतपदाच्या नियुक्तीचा वाद सुरू होता.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

Sadhu Burnt Alive in Kannauj  : उत्तर प्रदेश राज्यातील कन्नौजमध्ये मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. गुरसहायगंज येथील जलेश्वर आश्रमात मंगळवारी रात्री एका साधुला जिवंत जाळलं आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जखमी साधूला रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. 

गुरसहायगंज येथील जलेसर घाट मंदिर परिसरात एका २० वर्षीय साधु शिवदास उर्फ शिवम यांना जिवंत जाळण्याचा प्रकार समोर आला आहे. जखमी शिवम जलेश्वर घाट आश्रमाचे महंत रघुवीरदास यांचे शिष्य आहेत. सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व जखमी साधूला रुग्णालयात दाखल केले. 

शिवम यांनी आपल्या जबाबात पाच लोकांची नावे घेतली आहेत. यामध्ये अनिल,  आलोक  तसेच  साधु रामेश्वर दास, रघुनाथ दास व भोलादास आदिंचा समावेश आहे. शिवमने सांगितले की, या पाच जणांनी मिळून आग लावली होती. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आश्रमातील साधुंमध्ये महंत पदाच्या नियुक्तीवरून वाद सुरू होता. 

कन्नौजचे पोलीस अधीक्षक अमित कुमार आनंद यांनी सांगितले की, साधुला जिवंत जाळण्याच्या घटनेबाबत पोलिसांकडून पुरावे गोळा करण्यात आले आहे. सीसीटीव्ही फुटेज चेक केले असून आरोपींची ओळख होऊ शकली नाही. घटनेचा तपास केला जात असून कायदा-सुव्यवस्थेची कोणती समस्या नाही.

WhatsApp channel

विभाग