ED Action : दुबईत लपलेला खाण माफिया मोहम्मद इक्बालवर ईडीची कारवाई, ४४४० कोटींची मालमत्ता जप्त
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ED Action : दुबईत लपलेला खाण माफिया मोहम्मद इक्बालवर ईडीची कारवाई, ४४४० कोटींची मालमत्ता जप्त

ED Action : दुबईत लपलेला खाण माफिया मोहम्मद इक्बालवर ईडीची कारवाई, ४४४० कोटींची मालमत्ता जप्त

Jun 15, 2024 12:22 PM IST

ED action against mining mafia haji iqbal : दुबईत लपलेला खाण माफिया मोहम्मद इक्बालवर ईडीने मोठी कारवाई केली. लखनौ झोनल ऑफिसने शुक्रवारी सहारनपूरच्या ग्लोकल युनिव्हर्सिटीची तब्बल ४ हजार ४४० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली.

दुबईत लपलेल्या खाण माफिया व माजी आमदार मोहम्मद इक्बालवर ईडीची कारवाई, ४४४० कोटींची मालमत्ता जप्त
दुबईत लपलेल्या खाण माफिया व माजी आमदार मोहम्मद इक्बालवर ईडीची कारवाई, ४४४० कोटींची मालमत्ता जप्त

ED action against mining mafia haji iqbal : सहारनपूरमध्ये अवैध खाणकाम प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. ईडीने बसपाचे माजी आमदार मोहम्मद इक्बाल यांच्या ग्लोकल युनिव्हर्सिटीची १२१ एकर जमीन व इमारत जप्त केली असून जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत जवळपास ४,४४० कोटी रुपये आहे. सध्या हे आमदार दुबईत लपून बसले आहेत. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) लखनौ विभागीय कार्यालयाने शुक्रवारी ही कारवाई केली. अब्दुल वाहिद एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्टच्या नावावर जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांची नोंद आहे. हे ट्रस्ट मोहम्मद इक्बाल व त्यांचे कुटुंब नियंत्रित करतात व चालवतात.

वक्फ बोर्डाला दिलेल्या निधीवरून मनसे, विश्व हिंदू परिषद आक्रमक! दाढीचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंवर कडवट शब्दांत टीका

प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट (पीएमएलए) च्या २००२ च्या तरतुदीनुसार अवैध खाण प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. सहारनपूर जिल्ह्यातील बेकायदेशीर खाणकाम आणि लीज धारकांच्या परवान्यांचे बेकायदेशीर नूतनीकरण या प्रकरणात भ्रष्टाचारासह सीबीआय दिल्लीने दाखल केलेल्या विविध एफआयआरच्या आधारे ईडीने या प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला होता. खाण लीजचे बेकायदेशीर नूतनीकरण केल्याप्रकरणी सीबीआयने महमूद अली, दिलशाद, मोहम्मद इनाम, मेहबूब आलम (मृत), नसीम अहमद, अमित जैन, विकास अग्रवाल, मोहम्मद वाजिद मुकेश जैन आणि पुनीत जैन यांच्यासह काही सरकारी अधिकारी आणि अज्ञात व्यक्तींना अटक केली आहे.

TCS news : भारताची सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसला अमेरिकी कोर्टाकडून जबरदस्त दंड, काय आहे प्रकरण?

ईडीच्या तपासात असे दिसून आले आहे की सर्व खाण कंपन्या मोहम्मदच्या मालकीच्या व त्याच्या मार्फत चालवल्या जात होत्या. इक्बाल ग्रुपच्या या कंपन्या सहारनपूर आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध खाणकाम करत होत्या. आयटीआरमध्ये कमी उत्पन्न दाखवून या कंपन्या आणि समूह कंपन्यांमध्ये कोणतेही व्यावसायिक संबंध नसताना कोट्यवधींचे व्यवहार बेकायदेशीररित्या केले असल्याचे आढळले. यासोबतच अब्दुल वाहिद एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट सहारनपूरच्या बँक खात्यावर अनेक बनावट संस्था व बनावट व्यवहारांद्वारे असुरक्षित कर्ज आणि देणग्या स्वरूपात मोठी रक्कम पाठवण्यात आली.

माजी आमदार इक्बाल लपला दुबईत

अब्दुल वाहिद एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व विश्वस्त मो. इक्बालच्या कुटुंबीयांसह स्वत: इक्बाल. ट्रस्टचा निधी नंतर सहारनपूरमध्ये जमीन खरेदी करण्यासाठी आणि ग्लोकल विद्यापीठासाठी इमारत बांधण्यासाठी वापरला गेला. बेकायदेशीर खाणकामातून मिळालेली कमाई, ५०० कोटींहून अधिक रक्कम, जमीन खरेदी करण्यासाठी आणि विद्यापीठाच्या इमारती बांधण्यासाठी वापरली गेली. या मालमत्तांचे सध्याचे बाजारमूल्य ४ हजार ४३९ कोटी रुपये आहे. मो. इक्बाल सध्या फरार आहे. तो दुबईत लपून बसल्याचे समजते. त्यांची चार मुले आणि भाऊ सध्या तुरुंगात आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास अद्याप सुरू आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर