Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातील बहराइचमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिथे एका तरुणाने दुचाकीची चावी दिली नाही म्हणून पेटवून घेतले. घरच्यांनी आरडाओरडा केल्यानंतर शेजारच्या लोकांनी ब्लँकेट टाकून आग विझवली. मात्र, तोपर्यंत संबंधित तरुणाच्या शरीराचा ६० टक्के भाग भाजला. भाजलेल्या अवस्थेत शेजारच्या लोकांनी त्याला वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. ही घटना शनिवारी रात्री घडली असून तरुणाच्या या कृत्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.
ही घटना फखरपूर पोलीस ठाण्याच्या अलीनगर गावातील आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास आशाराम यांचा १८ वर्षीय मुलगा दुचाकीवरून बाहेर पडला. रात्री दहा वाजता तो घरी पोहोचला. फ्रेश झाल्यावर वहिनी सुगाने त्याला जेवायला सांगितले. पण त्याने जेवण्यास नकार दिला आणि दुचाकीची चावी मागितली. पण त्याच्या वहिणीने त्याला आधी जेवायला सांगितले. यामुळे संतापलेल्या तरुणाने दुचाकीच्या टाकीतून पेट्रोल काढून अंगावर ओतले. वहिनीला हा प्रकार समजण्याआधीच त्याने स्वत:ला पेटवून घेतले.
तरुणाने पेटवून घेतल्याचे वहिणीच्या लक्षात येताच तिने मोठ्यामोठ्याने आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून आजूबाजुच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तरुणाच्या अंगावर ब्लँकेट टाकून आग विझवली. तसेच तरुणाने तातडीने रुग्णवाहिकेतून फखरपूर सीएचसीमध्ये आणण्यात आले, तिथे त्याच्यावर प्रथम उपचार केल्यांतर त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. तिसऱ्या दिवशीही तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. या तरुणाचे लालापूरवा गावातील एका अल्पवयीन मुलीशी लग्न जुळवण्यासाठी चर्चा सुरू होती. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील ३४ वर्षीय न्यूरोसर्जन रविवारी दक्षिण दिल्लीतील राहत्या घरी मृतावस्थेत आढळले. गुजरातमधील राजकोट येथील रहिवासी असलेल्या राज घोनिया या डॉक्टरचा गौतमनगर परिसरातील त्याच्या घरात औषधांच्या वापरलेल्या कुपी आणि सिरिंज सापडल्याने संशयित ओव्हरडोसमुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली आहे, मात्र घोनिया यांनी आपल्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरले नसल्याची पुष्टी पोलिस अधिकाऱ्यांनी केली आहे.
रविवारी दुपारी दोनच्या सुमारास गौतमनगर परिसरातील एका डॉक्टरने आत्महत्या केल्याची पीसीआर कॉल हौजखास पोलीस ठाण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता घोनिया बेशुद्धावस्थेत आढळला, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. त्यांना तातडीने एम्समध्ये नेण्यात आले, जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. घोनिया एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये तैनात होते.