मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News: प्रेयसीसोबत फोनवर बोलत असल्याचा संशय; संतापलेल्या प्रियकराने मित्राचे गुप्तांग कापले

Viral News: प्रेयसीसोबत फोनवर बोलत असल्याचा संशय; संतापलेल्या प्रियकराने मित्राचे गुप्तांग कापले

Jun 21, 2024 12:39 PM IST

Uttar Pradesh Man Cut Best Friends Private Parts: प्रेयसीशी फोनवर बोलत असल्याच्या संशयातून एका तरुणाने मित्राचे गुप्तांग कापले.

प्रेयसीशी फोनवर बोलत असल्याच्या संशयावरून प्रियकराने मित्राचे गुप्तांग कापले
प्रेयसीशी फोनवर बोलत असल्याच्या संशयावरून प्रियकराने मित्राचे गुप्तांग कापले (HT_PRINT)

Uttar Pradesh Crime: मैत्रीसारख्या पवित्र नात्याला काळिंबा फासणारी घटना उघडकीस आली. एका तरुणाने आपल्या प्रेयसीशी बोलणाऱ्या मित्रावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला आणि त्यानंतर त्याचे गुप्तांप कापले. या घटनेनंतर मित्राला रक्ताच्या थारोळ्यात टाकून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन जखमी तरुणाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. तसेच आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

हे प्रकरण उज्जैनजवळील महिदपूरच्या चोरवा सा बडला गावातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भैरूलाल बैरागी असे आरोपीचे नाव असून तो मध्य प्रदेशातील नागदा येथील रहिवासी आहे. तर, अंकित चौहान असे रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपी आणि पीडित दोघे एकमेकांचे चांगले मित्र होते आणि एकाच कंपनीत काम करत होते.

ट्रेंडिंग न्यूज

फोनवर बोलण्यावरून दोघांत वाद पेटला

दरम्यान, मंगळवारी भैरूलाल आणि अंकित दोघेही पिकअपमधून कामावर जात होते. यावेळी भैरूलाल गाडी चालवत होता. तर, अंकित फोनवर कोणाशी तरी बोलत होता. अंकीत हा आपल्याच प्रेयसीशी फोनवर बोलत असल्याचा भैरूलालला संशय आला. यामुळे भैरुलालने अंकितसोबत वाद घालायला सुरुवात केली. अंकितने भैरूलालला गाडी थांबवण्यास सांगितले. मात्र, दोघांमधील वाद आणखी पेटला आणि भैरुलालने अंकितवर लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्या अंकितच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आणि तो जमीनीवर पडल. भैरुलाल एवढ्यावरच थांबला नाही, त्याने चाकूने अंकितचे गुप्तांग कापले आणि घटनास्थळावरून फरार झाला.

आरोपीचा शोध सुरू

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळ गाठून अंकितला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. पीडितच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी फरार आरोपी भैरूलाल याच्याविरुद्ध भादंवि कलम ३२६ आणि अन्य कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक केल्यानंतरच या हल्ल्यामागील सत्य समोर येईल. 

WhatsApp channel
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर