लग्नाला नकार दिला म्हणून अल्पवयीन मुलीचे तुकडे करण्याची धमकी
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  लग्नाला नकार दिला म्हणून अल्पवयीन मुलीचे तुकडे करण्याची धमकी

लग्नाला नकार दिला म्हणून अल्पवयीन मुलीचे तुकडे करण्याची धमकी

Updated Nov 28, 2022 12:11 PM IST

Kanpur Minor girl threatening case: लग्नास नकार दिला म्हणून एका अल्पवयीन मुलीचे तुकडे करण्याची धमकी देणाऱ्या गुंडाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

Kanpur Crime News
Kanpur Crime News

Kanpur Minor girl threatening case: श्रद्धा वालकर हिच्या निर्घृण हत्याकांडानं देश हादरला असतानाच उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका इसमानं १७ वर्षीय मुलीला तुकडे तुकडे करून ठार मारण्याची धमकी दिली आहे. संबंधित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. 

मोहम्मद फैज असं या आरोपीचं नाव आहे. तो एका अल्पवयीन मुलीच्या मागे लागला होता. तो सतत तिचा पाठलाग करायचा. तिच्या मागे शाळेत जायचा आणि तिला वारंवार त्रास द्यायचा. मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी फैजचं समुपदेशन करण्याचाही प्रयत्न केला, पण त्याच्यात सुधारणा झाली नाही.

या मुलीनं आपल्याशी लग्न करावं यासाठी त्यानं तगादा लावला होता. मात्र, पीडित मुलीनं लग्नास नकार दिला. त्यामुळं संतापलेल्या मोहम्मद फैज यानं तिला जीवे मारण्याची धमकी दिली. ‘माझ्याशी लग्न केलं नाहीस तर तुझे तुकडे तुकडे करीन,’ अशी धमकी त्यानं दिली. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांशी संपर्क साधून मुलीच्या जीवाला धोका असल्याचं सांगत फैजविरोधात तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या आधारे नौबस्ता पोलिसांनी फैजच्या चमन गंज येथील निवासस्थानी छापा टाकला. फैजच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. त्यांची पोलिसांशी झटापटही झाली. फैजला ताब्यात घेण्यासाठी आणखी काही पोलीस कर्मचाऱ्यांना बोलवावं लागलं. फैज विरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. अटक केल्यानंतर त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर